इनरव्हील क्लब तर्फे पथनाटिका स्पर्धा उत्सहात संपन्न..

 

सैय्यद ज़ाकिर

जिल्हाप्रतिनिधी वर्धा..

हिंगणघाट : शहराच्या इतिहासा मध्ये पहिल्यांदाच इनरव्हील क्लब तर्फे तालुकास्तरीय पथ नाटिका स्पर्धा 13 आक्टोंबर 2023 रोजी हिंगणघाट येथील कारंजा चौक येथे घेण्यात आली होती..

          स्पर्धे मध्ये हिंगणघाट तालुक्यातील ९ शाळा आणि जूनियर कॉलेज यांनी सहभाग घेतला होता.स्पर्धे अंतर्गत विविध सामाजिक विषयावर सुंदर उत्कृष्ट पथनाट्य प्रस्तुत करण्यात आले.

              स्पर्धा अन्वये प्रथम क्रमांक इंदिरा गांधी विद्यालय अल्लीपुर टिमचा आला तर द्वितीय क्र.आगरकर विद्या भवन स्कूल हिंगणघाट टिमचा आलाय.तद्वतच तृतीय क्र.आर.एस.बिडकर ज्यु.कॉलेज हिंगणघाट,टिमचा आलाय.

         तिन्ही शाळेतील स्पर्धक विजयी चमूना आयोजकातर्फे प्रोत्साहन पर बक्षीसे देण्यात आली व त्यांच्या स्मृती चिन्हे देऊन सत्कार करण्यात आला.

       तसेच प्रोत्साहन पुरस्कार मातोश्री महिला कॉलेज हिंगणघाट आणि घटवाई कॉलेज वडनेर यांना देण्यात आले.

          कार्यक्रमाचे उद्घाटन इनरव्हील क्लब डिस्ट्रिक् 303 चे चेयरमन श्रीमती शीला देशमुख मॅडम यांनी केले.

          स्पर्धेचे आयोजन इनरव्हील क्लब हिंगणघाट अध्यक्ष सीए पूजा हुरकट,क्लब सचिव सारिका डोंगरे,प्रोजेक्ट डायरेक्टर नयना तुडसकर आणि संगीता गड़वार,माजी अध्यक्ष शोभा बोथरा आणि सदस्य यांनी केले होते.

        स्पर्धेचे संचालन प्राचार्य अभय दांडेकर,आणि स्पर्धेचे परिक्षण प्राचार्य शिल्पा चौहान आणि भांगे सर भारत विद्यालय हिंगणघाट यांनी केले.

         ही स्पर्धा बघण्यासाठी हिंगणघाटची जनता मोठ्या संख्येंनी उपस्थित होती…