शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर यांचेकडून गडचिरोलीत समुपदेशन सत्राचे आयोजन…

 

सतिश कडार्ला

  प्रतिनिधी

गडचिरोली, दि.१७ : जिल्हयातील सर्व कनिष्ट महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक तसेच विद्यार्थी व

त्यांचे पालक यांच्यात उच्च शिक्षणाविषयी जागरुकता निर्माण करुन जिल्हयात कौशल्य विकास, तंत्रज्ञानाची वाढ करण्यासाठी, शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय, चंद्रपूर या महाविद्यालयात अत्यल्प / निशुल्क शैक्षणिक शुल्क असून यात शिकविण्यात येणारे अभ्यासक्रम सर्व सुविधा व शासनाच्या विविध योजना / सवलती तसेच रुपये २६३ कोटी च्या CIIT केंद्रातील नाविन्यपूर्ण व अत्याधुनिक शैक्षणिक प्रयोगशाळा व त्यावरील अभ्यासक्रम तसेच अभियांत्रीकी महाविद्यालयातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयाबाबत विस्तृत माहिती अवगत करण्याकरीता दिनांक १८ एप्रिल रोजी मंगळवारला, शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० वाजे पर्यंत पथक पाठविण्यात येणार आहे. करीता उपरोक्त समुपदेशन सत्राकरीता गडचिरोली जिल्हयातील सर्व कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक तसेच त्यांचे विद्यार्थी व पालक यांनी जास्तीत जास्त उपस्थित राहण्यासाठी सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी आवाहन केले आहे.