Home Crime पळसगाव,पिपर्डा-विहीरगाव येथे देशी दारुची सर्रास विक्री…

पळसगाव,पिपर्डा-विहीरगाव येथे देशी दारुची सर्रास विक्री…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

       चिमुर तालुक्यातील मौजा पळसगाव व पिपर्डा,विहीरगाव या तिन्ही गावात देशी-विदेशी दारूचा महापुर वाहात असुन याकडे कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे असामाजिक अवैध तत्वांना उधान आले आहे.

       याचबरोबर कार्यवाई होत नसल्याने सामाजिक वातावरण गढुळ होत चालले आहे.अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

        अवैध दारूच्या विक्रीमुळे गावातील तरुण व्यसनाधीन झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे.शालेय विद्यार्थी दारुच्या आहारी जाऊन उध्वस्त होत असल्याने पालक वर्गांनी चिंता व्यक्त केली आहे.

          संबंधित अवैध दारूच्या अड्ड्यावर धाड मारुन कार्यवाही करावी अशी मागणी तिन्ही गावातील नागरिक करीत आहेत.

       पोलिस विभागासी अवैध दारू विक्रेत्यांची साठगाठ असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.यामुळेच दारुचे अड्डे निर्माण करण्यास वाव मिळत आहे अशी गाव तेथे चर्चा आहे.. 

        चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तात्काळ लक्ष देवून या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी गावातील महीला,समाज सुधारक व सुज्ञ नागरिक करीत आहेत.