अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
अमरावती :- शहरात अवैध ड्रग्स व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमरावती गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, अब्दुल राजिक अब्दुल ताहीर (वय ३२, राहणार अल हिलाल कॉलनी, अमरावती) या आरोपीला एमडी ड्रग्जची विक्री करताना ताब्यात घेतले.
माहितीनुसार, आरोपी काळ्या रंगाच्या बर्गमन मोपेडवर पांढरी हनुमान मंदिराजवळ येत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासमक्ष ताब्यात घेतले आणि त्याचेकडून एमडी ड्रग्ज – ५६ ग्रॅम, अंदाजे किंमत ₹५,६०,०००, बर्गमन कंपनीची मोपेड – किंमत ₹१,१०,०००,व्हिवो कंपनीचा मोबाईल – किंमत अंदाजे ₹१०,००० असा एकूण ₹६,८०,०००/- किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
सध्या आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कामगिरी पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त श्री शाम घुगे, श्री गणेश शिंदे, श्री रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अमरावती शहर गुन्हे शाखा पथकाने केली. पथकात सपोनी मनीष वाकोडे, हेड कॉन्स्टेबल सतीश देशमुख, हेड कॉन्स्टेबल फिरोज खान, हेड कॉन्स्टेबल अजय मिश्रा, कॉन्स्टेबल सुरज चव्हाण, कॉन्स्टेबल शेख नाझीम, कॉन्स्टेबल रणजित, कॉन्स्टेबल चेतन कराळे, कॉन्स्टेबल सागर ठाकरे हे कर्मचारी सहभागी झाले.



