जरांगे पाटलांचे वादळ येत्या शुक्रवारी राजगुरुनगर मध्ये धडकणार…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : मराठा आरक्षण आंदोलनात रोखठोक भुमिका मांडणारे मनोज जरांगे पाटील यांच वादळ येत्या शुक्रवारी (दि. २०) पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे धडकणार आहे. त्यानिमित्ताने न भूतो न भविष्याते अशी जाहीर सभा होणार असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

       मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यावरुन सरकारची झालेली कोंडी, तसेच जरांगे पाटील यांनी नुकतीच घेतलेली विराट मराठा सभा यामुळे खेड तालुक्यात होणाऱ्या या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या १ ऑक्टोबर पासून राजगुरूनगर येथे बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे.

         खेडच्या या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी मनोज जरांगे पाटील भेट देऊन येथे आयोजित सभेला संबोधीत करणार आहेत. सभेसाठी मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी सभापती अंकुश राक्षे यांनी केले आहे.