डॉ.आंबेडकरांच्या संविधानामुळेच देश सुरक्षित आहे :- डॉ.सुनील वाघमारे 

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : विश्वमानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच देशाला जागतिक पातळीवर मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ.बाबासाहेबांनी चौफेर क्षेत्रात योगदान देत देशाला बलवान बनवले. त्यांनी साकारलेल्या संविधानामुळेच देश सुरक्षित आहे, असे इंद्रायणी सेवा फौंडेशनचे सचिव डॉ.सुनील वाघमारे यांनी व्यक्त केले. आजच्या युवा पिढीने डॉ.बाबासाहेबांचे विचार आचरणात आणून समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

        आळंदी येथील चऱ्होली खुर्द मधील तनीष सृष्टी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीतर्फे विविध सामाजिक उपक्रम कार्यक्रमांनिशी साजरी करण्यात आली. यावेळी महीला व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

         यावेळी इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, उपाध्यक्ष शिरीषकुमार कारेकर, सचिव डॉ.सुनील वाघमारे, जनार्दन पितळे, अरुण बडगुजर, गणेश कोद्रे, अनिल देशमुख, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, शैलेश हाटे, बाळासाहेब खरात, पोपटराव वाघमारे, विलास नितनवरे, संतोष आखाडे, युवराज मोटघरे, हर्षल कुंभारे उपस्थित होते. 

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य केवळ दलित समाजापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण देशासाठी स्वतंत्रता, समता, आणि बंधुभाव या त्रिसूत्रीव्दारे सर्वांना प्रेरणा देणारे आहे, असे मत डॉ.सुनिल वाघमारे यांनी व्यक्त केले.आजच्या युवा पिढीने डॉ आंबेडकर यांच्यापासून आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.