राजवर्धनदादा पाटील यांनी बघितला विद्यार्थ्यांसोबत सत्यशोधक चित्रपट…. — चित्रपट बघून विद्यार्थी भारावले…

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

          इंदापूरमध्ये राजवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांसमवेत सत्यशोधक चित्रपट बघितला. त्यांनी समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट विद्यार्थ्यांना मोफत दाखवला, जेणेकरून त्यांना शिक्षण, संघर्ष, समाजाशी असलेली नाळ यातून मनात रूढ होईल.  

            यावेळी राजवर्धन पाटील म्हणाले, एक समाजसुधारक चित्रपटाचे महत्व लक्षात घेऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हा चित्रपट विद्यार्थ्यांना मोफत दाखवण्याच्या सूचना केल्या होत्या. यामुळे आम्ही हा चित्रपट विद्यार्थ्यांसोबत बघितला. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी, तसेच आपण समाजाशी कसे एकरूप होऊ शकतो. 

          आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, यातून विद्यार्थ्यांना धडे मिळावे असे हेतू यामागे असल्याचे राजवर्धन पाटील यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले, विद्यार्थ्यांना असले चित्रपट आपल्या भावी आयुष्यात नक्कीच प्रेरणादायी ठरतात.

           यामुळे ते समाजापर्यत पोहोचणे आवश्यक असते. यामुळे आज विद्यार्थ्यांना सत्यशोधकांचे दर्शन घडवले. मुलांना देखील हा चित्रपट बघून समाधान वाटलं, यातून नव्या पिढी घडताना त्यांना नक्कीच मदत होईल, असेही राजवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.