वाघाच्या झुंजीत वाघाचा मृत्यू… — एक वाघ गंभीर जखमी..

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर:-

           चिमूर तालुका अंतर्गत खडसंगी वनक्षेत्र वहानगाव येथे दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली तर झुंजीत एक वाघ गंभीर रित्या जखमी झाला असून त्याच ठिकाणी तोही बसून आहे.

        ही घटना आज दि.१४ नोव्हेंबर दुपारी साडेतीन वाजताची आहे.सदर वाघाची झुंज वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतात झाली असून वाघाला बघण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली आहे.

      तसेच हा वाघ नर असून जवळपास सहा ते सात वर्षाचा आहे,अशी माहिती वनविभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

         मोका चौकशी पंचनामा नंतर पुढील आवश्यक कारवाई वनविभाग करीत आहे.