गांधी जयंती निमित्ताने शालेय विध्यार्थ्यामार्फत स्वच्छते संबंधित विविध उपक्रम… — तंबाकूमुक्त शाळा होण्यासाठी विध्यार्थी आणी शिक्षकांनी घेतले प्रण.. — जि.प.शाळा क्र.१ तर्फे स्वछतादूत प्रशांत तावडेचा सत्कार…

  सुधाकर दुधे 

सावली प्रतिनिधी

      सावली शहरातील जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा क्र.१ सावली तर्फे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने शालेय विध्यार्थ्यामार्फत स्वच्छते-संबंधित विविध उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी १ तास स्वछतेसाठि व तंबाकूमुक्त भारत शाळेसाठी विध्यार्थी आणी शिक्षकांनी प्रण घेतले.

        गांधी जयंती निमित्याने सावली शहरातील प्रसिद्ध स्वछतादूत मा.प्रशांत तावडे यांचा सत्कार करण्यात आला.प्रशांत तावडे हे मागील कित्येक वर्षांपासून कोणतेही लोभ न बागळता समाज सेवा करीत आहेत त्याचे समाजसेवेचे कार्य बघता त्यांचा सत्कार करण्यात आला,विद्यार्थि सुद्धा त्यांचा कडून प्रेरणा घेत असतात.

         या प्रसंगी जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा क्र.१ सावलीचे मुख्याधापक विजय हरामवार,तसेच शाळेतील सहायक शिक्षका सौ.ज्योति संतोषवार, सौ.शामल तोटावार ,सौ.ममता ताटकोंडावार ,सौ.मंगला गोंगले,कु.सविता नंदनवार,कु.वंदना कुंभारे,व शिक्षक मा.विक्रांत रामटके व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.