संविधांनामुळे आज आपण उभे आहोत,हि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देण..:- भोजराज कान्हेकर..

ऋषी सहारे

संपादक

     गडचिरोली दि.१४- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केले म्हणुन आज आपण सर्वजण संविधानामुळे आपण ताठ मानेने उभे आहोत.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते की सारा देश बौद्धमय करीन,परंतु ते अपुरेच राहीले आहे.भारत बौध्दमय करण्याची जबाबदारी आपल्यावर येवुन पडली आहे,अश्या प्रकारचे मार्गदशन भोजराज कान्हेकर यांनी पोटेगांव येथील कार्यक्रमा प्रसंगी केले. 

        बहुउद्देशिय मंडळ पोटेगांवच्या वतीने दिक्षाभूमी पोटेगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यकम प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहन करण्यात आले.

           कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन भोजराज कान्हेकर तर प्रमुख अतिथी म्हणुन आदिवासी युवा नेते विनोद मडावी,भोयर सर,मेश्राम, वनक्षेत्रपाल चौधरी,डॉ.विजय रामटेके आदि लाभले होते.

        याप्रसंगी प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी सांगितले की,डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी तमाम बाधवांना धम्माची दिक्षा देताना सांगितले होते की नागपूर मधे RSS आहे म्हणुन नाही तर नागपूर मधे नाग वंशज लोकांची वस्ती होती म्हणून या नागवंशी शहरात बौद्ध धम्म दिक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.आर्य आणि नाग लोकांमधे युद्ध व्हायचे,मात्र हे सर्व शांतीच्या मार्गाने बुद्धाकडे वळले पाहीजे म्हणुन विजया दशमीच्या दिवशी बाबासाहेबांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली असेही ते म्हणाले. 

        तो दिवश १४ ऑक्टोबर होता.याप्रंसगी डॉ.विजय रामटेके,विनोद मडावी,भोयर सर आदिची भाषणे झालीत.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सामाजीक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुजमकर यांनी तर आभार दिवाकर फुलझेले यांनी मानले.

        कार्यक्रमास शिधार्थ गोवर्धन,देवाजी बांबोळे,लेनिन कुकडकर,रामटेके,संगिता मुजमकर,कल्पना फुलझेले,प्रतिज्ञा मंजुमकर,इंदिरा कुकुडकर सहीत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.