माजी राज्यमंत्री दानशूर राजे अम्ब्रिशराव महाराजांनी गीताली येथील अविनाश मंडल यांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत….

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

मूलचेरा:-

         तालुक्यातील स्थानिक शांतिग्राम ग्रामपंचायत क्षेत्रातील गीताली येतील रहवासी असलेले अविनाश मंडल हे काही दिवसापासून ब्रेन ट्युमर या आजाराने ग्रस्त आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे आणि ब्रेन ट्युमर या आजाराच्या उपचारासाठी खर्च खूप मोठ्या रकमेचा असल्याने त्यांच्या कुटुंबात खूप मोठी अडचण या परिवारावर आली होती.पण ही बाब राजे अम्ब्रिशराव महाराज माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लक्षात येताच त्यांनी अविनाश मंडल यांच्या कुटुंबाला 10000 रुपयाची आर्थिक मदत केली.त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आधार झाला,आणि तसेच मंडल कुटुंबाला सर्वतोपरी पुन्हा मदत करण्याच आश्वासन सुध्दा राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी दिल.विशेष बाब म्हणजे अहेरी इस्टेट चे दानशूर राजे अम्ब्रिशराव महाराज हे अनेकदा आपल्या दानवीर स्वभावाने आपल्या क्षेत्रातील लोकांना रोगाने ग्रासलेल्या,अडी-अडचणीत, संकटात सर्वोपरी मदत करीत असतात आणि त्यांनी आतापर्यंत अनेक गरजु लोकांना आर्थिक मदत केली आहे,यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती बासू मुजुमदार,गणेश गारघाटे, किशोर मल्लिक,वैष्णव ठाकूर,रंजित मंडल, ज्योत्स्ना मंडल, प्रभाष मंडल,रमेश बैरागी, अमूल्य मंडल,सुवेन्दू मित्र तसेच अविनाश मंडल यांच्या कुटुंबातील सदस्य आणि गीताली येथील गावकरी उपस्थित होते.