वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली येथे प्रथोमपचार विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

साकोली -वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर द्वारा संचालित वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली येथे प्रथोमपचार विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अमित टेंभुर्णे शारीरिक शिक्षा निर्देशक एम. बी. पटेल कॉलेज साकोली उपस्थित होते. डॉ. अमित टेंभुर्णे यांनी दैनदिन जीवनात प्रथोमपचाराची आवशक्यता सांगितली त्याचबरोबर प्रथोमपचार कसे कराचे व आपत्कालीन परिस्थितीत प्रथोमपचार कश्या प्रकारे उपयोगात येते याबद्दल सविस्तर माहिती आपल्या मार्गदर्शनात दिली. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी यांनी सांगितले कि, प्रथमोपचारामध्ये अपघात, पडणे, दुखापत, रोग किंवा गरजू व्यक्तीच्या (पीडित) सुरक्षेला आणि आरोग्यास धोका निर्माण करणार्याअ इतर कोणत्याही कारणांमुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार आवश्यक असतो ते कुठेही येऊ शकतात आणि त्वरित उपचाराने पीडिताची स्थिती सुधारू शकते. म्हणून प्रत्येक व्यक्तीला प्रथोमपचार करता येणे आवश्यक आहे, प्रथमोपचार करत असताना कोणती काळजी घ्यावी या बद्दल सुद्धा मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर यांनी केले त्याचबरोबर प्रथमोपचार देताना आपण काय लक्षात ठेवले पाहिजे या बद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. राजश्री यांनी केले. तसेच हा कार्यक्रम योग्यरित्या पार पडावा म्हणून महाविद्यालयातील सर्व कर्मचारी प्रा. नीरज अतकरी, देवेंद्र इसापुरे, पुकराज लांजेवार, शाहीद सैयद , दिव्या कुंभारे आणि विद्यार्थ्यांनी सहयोग केले.