सार्वजनिक वाचनालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी…

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि भंडारा 

कन्हान : – सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेका नंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.

            कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक वासुदेवराव चिकटे प्रमुख अतिथी वरिष्ठ पत्रकार कमलसिंह यादव , गंगाधर अवचट आदि मान्यवरांचा हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमा ची सुरूवात करण्यात आली.

         यावेळी गंगाधर अवचट , रोशन तांडेकर, कृणाल कोल्हे मान्यवरांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

         कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित सभासद, वाचकांनी व नागरिकांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेला पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन करित जयंती साजरी करण्यात आली.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकरराव मस्के यांनी केले. सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्याम बारई ग्रंथपाल यांनी केले. शेवटी अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

           याप्रसंगी प्रदीप भोंडे, राहुल पारधी, आकाश वैद्य, आकाश घोरपडे, यश तेलोले, कु. कृष्णाली कोल्हे , कु. कस्तुरी कोल्हे सह सभासद, वाचक आणि नागरि क प्रामुख्याने उपस्थित होते.