राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सवाचा “पुअर शो” ? — १२८ पैकी फक्त ८ शाळांचा सहभाग.

 

तालुका प्रतिनिधी,

मूल: —

        राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव..२०२३चे नेहरू विज्ञान केंद्र,मुंबई तफै आयोजन सुरू आहे. मात्र राज्यस्तरीय शालेय विदयार्थी नाटयोत्सव स्पधैचा मूल तालुका शिक्षण विभागातफै फज्जा उडविण्यात आल्याचे चित्र बघावयास मिळाले. 

       तालुक्यातील १२८ शाशन मान्यताप्राप्त पैकी जेमततेम ८ शाळांना या शाशकीय, शैक्षणिक उपक़मात पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी व भाग शिक्षणाधिकाऱ्यांना सामील करुन घेता आला. 

         झाकलेल्या” पुअर शो” मध्ये जेमतेम विदयार्थी व शिक्षक टाईमपास करताना बघून शाशनाच्या या उपक़मात संपूर्ण तालुक्यातील १२८ शाळेत,हजारो विदयार्थी, शेकडो शिक्षक असताना सहभाग बघता या विभागाचे हसे झाले आहे. पंचायत समिती शिक्षण विभाग किती उदासीन होता हे यावरून लक्षात आले.

         एरव्ही दहावी,बारावी बोर्ड परिक्षांमध्ये ‘अर्थपूर्ण’ उडया मारणारे हे पंचायत समितीचे शिक्षण कर्मचारी या राज्यस्तरीय स्पधैचा रंगमंचावरील साधा ‘बॅनर’ ही बसविण्यास ना- लायकीच करल्याची खंत व्यक्त होत आहे.

             नेहरू विज्ञान केंद़, मुंबई तर्फे राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव..,२०२३ चे आयोजना करण्यात येत असून नागपूर विभागीय स्तरावर यशस्वी आयोजन करण्यासंबंधाने प्रादेशिक विद्या प्राधिकरण,नागपूर यांनी शिक्षण उपसंचालक,सर्व शिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे दि.८/८/२०२३ ला सुचना, अटीशर्थी ,वेळापत्रक दिले.

        यानुसार तालुका स्तरावर दि.१ ते १० सप्ते. पर्यंत जस्तीत जास्त शाळांना तयार करून आयत्ता ६ ते १० वी च्या विदयार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारे नाटयप्रयोग् सादर करावयाचे होते. यातून एका प्रयोगाची निवड जिल्ह्याकरिता करावयाची आहे.

         या निमित्याने वाट यातून विज्ञान व तंत्रज्ञान लोकाभिमुख करणे,विदयार्थी, पालक,शिक्षक यांचे मध्ये जनजागृती करणे हा उद्धेश असताना मूल तालुक्यातील भाग व गट शिक्षणाधिकारी यांनी या उद्धेशालाचहरताळ फासून दि.८/९/२०२३ ला कर्मवीर महाविद्यालय मूल चे सभागुहात “पुअर शो” सादर करून आपण किती विज्ञानवादी आहोत हे दाखवून हसे करून घेतले आहे.

           मूल तालुक्यात शाशन मान्यताप्राप्त १२८ शाळा असताना केवळ ८ शाळांनी यात सहभाग नोंदविला. संपूर्ण तालुक्यातून ८ ते १० शिक्षक,जेमतेम ५/२५ विदयार्थी व सहभागी विदयार्थ्यांचे ८ ते १० पालक एवढा लवाजमा घेऊन राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सवाचा संपन्न करण्यात आला.

          प्रेक्षक म्हणून कर्मवीर महाविद्यालयाचे विद्यार्थी उपलब्ध झाले म्हणून फावले अन्यथा पंचायत समिती शिक्षण विभागाची मोठी छी थू झाली असती.

       विशेष म्हणजे रंगमंचावर साधा १०० रुपयाचा बैनर लावण्याइतपत ना-लायकी या अधिकाऱ्यांना दाखविता आली नाही.साध्या स्केच पेन ने घोटलेला बैनर लक्षात वेधून हसण्यावारी नेताना दिसला.

            मूल शहरातील तिन चार शाळांनी वेळेवर का होईना सहभागी होऊन बुज राखली.निरीक्षण वा परिक्षा असल्या की ‘अर्थपूर्ण’धावपळ करणारे पंचायत समितीचे गट व भाग शिक्षणाधिकारी शाशनाच्या व शैक्षणिक धोरण याबाबत किती गंभीर आहेत हे राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सवाच्या “पुअर शो” बघून लक्षातच आले असल्याची संपूर्ण तालुक्यात चर्चा राहिली.