Home Maharashtra विदर्भ इमारत व ईतर बांधकाम कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाची सिंदेवाही...

विदर्भ इमारत व ईतर बांधकाम कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाची सिंदेवाही कार्यकारणी घोषित… — अध्यक्षपदी लक्ष्मीकांत कामतवार सचिव पदी अरविंद सिडाम…

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधी

 दखल न्यूज़ भारत

सिंदेवाही :- दिनांक 9/10 रोज बुधवार ला बोरकर भवन सिंदेवाही लोनवाही येथे झालेल्या विदर्भ इमारत व ईतर बांधकाम संघ ची बैठकीत सिंदेवाही कार्यकारणीची घोषित करण्यात आले.

           काल झालेल्या बैठकीत महाराष्ट्र गोवा प्रभारी मनोहर साळवे तसेच विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रभारी अरविंद कोरे यांनी सिंदेवाही तालुका कार्यकारणी ची घोषणा केली. त्यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून लक्ष्मीकांत कामतवार तर सचिवपदी अरविंद सिडाम यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच सहसचिव म्हणून प्रविण निकुरे, उपाध्यक्ष म्हणून सुमीत वलादे, माणिक नन्नावरे ,आसाराम बोरुले कोषाध्यक्ष पदी उमेश कोलते. तसेच संघटनमंत्री राकेश डांगे तसेच सदस्य संचालक म्हणून विनोद सहारे याची निवड करण्यात आली.

           कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र गोवा प्रभारी प्रदेशाध्यक्ष मनोहर साळवे यांनी संघटनेचे महत्त्व पटवून दिले तसेच कामगार विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली तसेच जास्तीत कामगारांनी संघटनेला जोडून विविध योजनाचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले तसेच विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रभारी अरविंद कोरे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष मोरेश्वर बोरकर, प्रमोद मेश्राम याची उपस्थित होती.

          यावेळी विविध कामगारांना विनंती करण्यात आली की त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्फत चौकशी करून योजनाचा लाभ घ्यावा अन्यथा सिंदेवाही तालुका कार्यालयाला भेट द्यावी असी सुचना यावेळी केले.

           यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद सिडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत कामतवार यांनी केले. त्यावेळी अनेकांची उपस्थिती होती.