Home आरोग्य टिळक विद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम…

टिळक विद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : तालुक्यातील टिळक विद्यालय, खंडाळा येथे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात, साकोली उपजिल्हा रुग्णालय येथील डॉ.बनसोड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना एड्स (AIDS) या रोगाबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

      यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एन निर्वाण सर, सेवा जेष्ठ शिक्षक, पी. एन.कापगते सर,डी.डी. तुमसरे सर, कुंभरे सर, करंजेकर सर, मेश्राम मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

             एड्स (अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम) हा एक गंभीर आजार आहे. डॉ. बनसोड मॅडम यांनी एड्स कशामुळे होतो, त्याची लक्षणे काय आहेत आणि यावर नियंत्रण कसे ठेवता येते, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यांनी एड्सच्या प्रतिबंधासाठी घ्यावयाची काळजी यावर विशेष भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे निरसन झाले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एड्सबद्दलची जागरूकता वाढण्यास मदत झाली.

       या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  

       कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाबद्दल मृणाली मेश्राम मॅडम यांनी डॉ.बनसोड मॅडम यांचे आभार मानले. 

         सदर कार्यक्रमाकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.