दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : भाविकांच्या सेवेसाठी आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या विकास निधीतून आळंदी देवस्थानला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात देवस्थानच्या वतीने रुग्णवाहिकेचे स्वागत करण्यात आले. यावेळी विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, योगी निरंजनाथ, ॲड.राजेंद्र उमाप, व्यवस्थापक माऊली वीर, डॉ.राम गावडे, रोहीदास तापकीर, प्रकाश वाडेकर, प्रफुल प्रसादे, आनंदराव मुंगसे, सुरेश झोंबाडे, अजित वडगावकर, अमोल वीरकर, सविता गावडे, संगिता फपाळ उपस्थित होते.
आळंदी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे येणाऱ्या भाविकांना तातडीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्याच उद्देशाने खासदार निधीतून ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेमुळे आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना तत्काळ मदत मिळेल आणि देवस्थानच्या सेवाकार्यात अधिक बळ मिळेल,” असे मनोगत खा. संजय जाधव यांनी व्यक्त केले.
भाविकांना तातडीची वैद्यकीय मदत वेळेत उपलब्ध व्हावी तसेच आषाढी व कार्तिक वारीत आरोग्य सेवा अधिक गतिमान व्हावी, या उद्देशाने ही रुग्णवाहिका उपयुक्त ठरणार असल्याची भावना विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे यांनी व्यक्त केली.



