पुस्टोला ग्रामपंचायत राम भरोसे…  निष्क्रीय ग्रामसेवकामुळे गावाचा विकास खुंटला…

 

ऋषी सहारे

संपादक

 

 गडचिरोली _ धानोरा तालुक्यातील पुस्टोला गट ग्रामपंचायत गट्टा पेंढरी रोडवरील ग्रामपंचायत पेसा अर्तगत ग्रामपंचायत येत असुन सुद्धा निष्क्रीय ग्रामसेवकामुळे गावाचा विकास खुटलेला आहे. गावातील नाल्या गेल्या तिन वर्षापासुन उपसा नाही. रोडची दैन्यावस्था झालेली आहे. गावात अगदी घानीचे साम्राज निर्माण झालेले आहे. रोडवरच गाव असल्यामुळे आवागमन करणाऱ्या लोकाच्या नजरेतून जाते, गावात ग्रामपंचायत मार्फतीने नाली बांधकाम करण्यात आले तेही निकृष्ठ दर्जाचे यातही प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे बोलल्या जात आहे.

     ग्रामसेवक मुख्यालयी न राहता घरभाडे मात्र घेण्यास विसरत नाही. सदर ग्रामसेवकाकडे दोन ग्रामपचायतीचा कारभार असल्यामुळे त्याचे चागलेच फावले आहे. गांवकरी आपल्या महत्वाच्या कामासाठी आले तर चपराशी सांगतो की बाबु दुसऱ्या ग्रामपंचायत मधे गेले आहेत. मात्र तिथेही त्यांचा पत्ताच नाही. वेसनाधिन ग्रामसेवक कुठेच भेटत नाही. अशी गावकर्‍याची तक्रार आहे. ग्रामपंचायत चा दरवाजा खुला असतो तिथे कोणीच हजर राहत नसल्यामुळे गुरे ढोरे पण घुस असल्याचे बोलल्या जाते . सदर ग्रामपंचायतीला वाली कोण अशा प्रश्न उद्भवत आहे. मी आता सेवानिवृत्त होणार माझे कुणी काहीही बिघडवू शकत नाही या तोर्‍यात ग्रामसेवक बोलतात अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. सदर गामसेवकांची तक्रार रिपाई नेते मारोती भैसारे धानोरा यांनी बिडिओ कडे दिल्याचे समजते.