स्वच्छतादूत प्रशांत तावाडे यांच्या निःस्वार्थ समाजकार्यामुळे युवक वर्गात नवचेतना निर्माण होईल.:-संदीप गड्डमवार…. — विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली तर्फे स्वच्छतादूत प्रशांत तावाडे यांचा सत्कार….

      सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

        सावली येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व तसेच स्वच्छतेचा मिशन म्हणून कार्य करणारे प्रशांत तावाडे यांचा विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याची पावती म्हणून नगरपंचायत सावली, सावली सोशल फाउंडेशन, तालुका माळी समाज सावली,गानली समाज सावली, सावली तालुका युवक कांग्रेस, आर्यवैश्य समाज सावली, रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली, यांच्याकडून त्यांचा गौरव करण्यात आला.

        प्रशांत तावाडे हे स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविण्याचे काम नित्यानेमाने करीत आहे.रोज सकाळी गोळीबार चौक,जयभीम वाचनालय परिसर, पोस्ट आफिस ,मुख्य रस्ता या परीसरामध्ये स्वच्छता करीत असतात. त्यांच्या या समाजापयोगी कार्याची दखल घेत भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संदीप पाटील गड्डमवार, सचिव राजाबाळ पाटील संगीडवार , उपाध्यक्ष अनिल स्वामी, विश्वशांती विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार, राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालायाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अशोक खोब्रागडे,विश्वशांती विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. राऊत, सहाय्यक शिक्षक किशोर संगीडवार, प्रा.प्यारमवार,प्रवीण काटपल्लीवार,प्रदीप कोहळे , प्रा.ढवस,सुधाकर मेश्राम , यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छतादूत प्रशांत तावाडे यांचा शाल,पुष्पगुच्छ, रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.