प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा दिमाखदार राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न….

 

प्रितम जनबंधु

संपादक 

 

लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूरच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा गुरूवार दिनांक ८ जून,२०२३ रोजी सकाळी ११.०० वा. डॉ. भालचंद्र ब्लड बँक सभागृह, लातूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिमाखदारपणे पार पडला. 

यावेळी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कार्याचा गौरव करीत पुरस्कारप्राप्त मान्यवरांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एल सी बी चे पी आय गजानन भातलोंढे, जे जे हॉस्पिटलचे माजी व्हॉईस डीन डॉ. विनायकराव पाटील यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे तर प्रमुख उपस्थितीत संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राज्य महिला अध्यक्षा डॉ सुधाताई कांबळे, राज्य उपाध्यक्ष विशाल पवार, पंकज वानखेडे, अजय सुर्यवंशी, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, संघटक बापू गायकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा संघटक संजय राजूळे, जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिवीता पाटील नारीभूषण रायगड, गजानन भातलोंढे प्रशासकीय लातूर, यवतमाळ जिल्हा कार्यकारी उत्कृष्ट जिल्हा यवतमाळ, डॉ. विठ्ठलराव जाधव शांतीभूषण पुणे, सुरेशचंद्र राजहंस राजकीय मुंबई, कु.सृष्टी जगताप लावणी लातूर, जय कराडे पत्रकारिता कोल्हापूर, नितीन शिंदे उद्योग नवी मुंबई, सुजाता अजनीकर सामाजिक लातूर, चंद्रशेखर स्वामी उद्योग लातूर, गजेंद्र कोठावळे कलाभूषण सिंधुदुर्ग, जळकोट तालुका कार्यकारिणी उत्कृष्ट तालुका, प्रकाश लब्दे कला (दशावतार) मुंबई, नांदेड जिल्हा कार्यकारिणी उत्कृष्ट जिल्हा, राघवेंद्र देबडवार सेवा लातूर, जयप्रकाश पवार उत्कृष्ट राज्य पदाधिकारी रायगड, मोहन कुमठेकर शैक्षणिक लातूर, ललिता पाटील आदर्श गृहिणी विजयनगर, हुकूमत मुलाणी डिजिटल मीडिया धाराशिव, विवेक सौताडीकर सांस्कृतिक लातूर, रवी गीते पोलीस यवतमाळ, डॉ. अमित पाटील आरोग्य लातूर, मंदाताई बनसोडे उत्कृष्ट राज्य महिला पदाधिकारी पिंपरी चिंचवड, सप्तफेरे वधू-वर सूचक केंद्र सेवा लातूर, अविनाश साठे महसूल लातूर, कलाधिराज कलापथक कला लातूर, हरेश कांबळे सेवा लातूर आदी व्यक्ती व संस्थांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच इयत्ता १० वी उतिर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी श्री भातलोंढे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संपूर्ण महाराष्ट्रात होत असलेले कार्य पाहून त्या कार्याचे कौतुक केले. डॉ. पाटील यांनी राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केल्याबद्दल संघाचे आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 अध्यक्षस्थानावरून डी. टी. आंबेगावे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कार्याचा आढावा सांगितला. डॉ. सुधाताई कांबळे व संजीव भांबोरे यांनी मनोगत व्यक्त केले. तर पुरस्कारप्राप्त मान्यवरांतून डॉ. अमित पाटील, जीविता पाटील, जयप्रकाश पवार, सुरेशचंद्र राजहंस यांनी मनोगत व्यक्त केले. 

सदर पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कार्याचा आलेख कसा उंचावत चालला आहे याची माहिती दिली, निवेदन मोठे सर तर आभार जिल्हा संघटक संजय राजूळे यांनी मानले.

दुपारी ४.०० ते ५.०० या वेळेत संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

 पुरस्काप्राप्त संस्था व मान्यवरांचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार व सभासदांनी अभिनंदन केले आहे.