वाईस ऑफ मिडीया तालूका संघ धानोरा तर्फे पत्रकार दिना निमित्त पत्रकार व मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन..

भाविकदास करमनकर 

तालुका प्रतिनिधी धानोरा..

      धानोरा तालुक्यातील सर्वात प्रथम क्रमांकावर असलेले ग्रामपंचायत मुरुमगाव येथील सभागृहात दिनांक 8 जानेवारी 2024 ठिक 11:00 वाजता वाईस ऑफ मिडीया तालूका पत्रकार संघटना तर्फे पत्रकार दिना निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव येथील रूग्णांना फळे वाटप कार्यक्रम घेण्यात आलाहोता.

        या मध्ये एकूण 40 रूग्णांना फळ आणी बिस्किट वाटप करण्यात आले व त्या नंतर लगेच मुरुमगाव ग्रामपंचायत सभागृहात स्वागत सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

        या काय॔क्रमाचे अध्यक्ष- मो.शरीफ भाई कूरैशी जिल्हा उपाध्यक्ष हे होते तक्ष तालूका अध्यक्ष वाईस ऑफ मिडीया तालूका धानोरा हे मुख्य अतिथी होते.

         कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिप प्रज्वलन ललितजी बरछा उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापति नगर पंचायत धानोरा यांनी केले.

       या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शिवप्रसाद गवरणा ग्रामपंचायत मुरुमगाव,माजी सभापती अजमन मायाराम राऊत पचांयत समिति धनोरा,सभापती नरेशजी चिमूरकर आरोग्य व स्वच्छता नगर पंचायत धानोरा,सरपंच शेवंताताई हलामी ग्रामपंचायत पन्नेमारा,तालूका अध्यक्ष सौ.लताताई पूगांटे भाजपा धानोरा,हिरेन हेमंत हालदार प्रतिष्ठित व्यापारी मुरुमगाव,मिटूं अभिमन्यू दत्ता प्रतिष्ठित व्यापारी मुरुमगाव,मुख्याध्यापक महेंद्र जांभूळकर स्व रामचंद्र दखने विद्यालय मुरुमगाव,पोलीस निरीक्षक सिरसाट पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव,वैद्यकीय अधिकारी डॉ.राहूल बनसोड प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव,क्षेत्र साहाय्यक देशपांडे वनपरिक्षेत्र कार्यालय पक्षिम मुरुमगाव,समीर भाई कूरैशी अध्यक्ष आदर्श पत्रकार संघटना धानोरा,मुख्याध्यापक रामटेके जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केन्द्र शाळा मुरुमगाव,माजी ग्रामपंचायत सदस्य मूनिर शेख मुरुमगाव,यांनी स्थान दर्शविले.

         त्याच प्रमाणे वाईस ऑफ मिडीया संघटना तालूका धानोरा येथील सर्व पत्रकार तालूका उपाध्यक्ष भाविकदास करमनकर, तालूका सरचिटणीस देवराव कूनघाडकर, सह-सरचिटणीस सिताराम बडोदे, कार्य वाहक श्रावण देशपांडे, संघटक बंडू सोमाजी हरणे, प्रसिद्ध प्रमुख ओम देशमुख, सदस्य मारुती भैसारे, सदस्य बालकृष्ण बोरकर, या सर्व पत्रकारांनी आपली प्रामुख्याने उपस्थित दर्शवली.

           वाईस ऑफ मिडीया तालूका धानोरा अतंर्गत पत्रकार दिनानिमित्त आयोजन करण्यात आलेल्या या काय॔क्रमात उपस्थित उपाध्यक्ष व बांधकाम सभापति ललितजी बरछा यांचे स्वागत तथ सत्कार जिल्हा उपाध्यक्ष व तालूका अध्यक्ष मो.शरीफ भाई कूरेशी वाईस ऑफ मिडिया धानोरा यांनी शाल श्रीफल व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले.

      त्याच प्रमाणे उपस्थित सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, शिक्षक वर्ग, व्यापारी वर्ग, वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, गाव पाटील, पोलीस पाटील, व गावातील प्रतिष्ठित नागरिक व उपस्थित संपूर्ण पत्रकारांचे शाल श्रीफल व आकर्षक भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले एकूण 30 मान्यवरांचे स्वागत सत्कार कार्यक्रम करण्यात आले!

पत्रकार दिनानिमित्त प्रास्ताविक बालकृष्ण बोरकर सर यांनी केला तर पोलीस अधिकारी सिरसाट, नगर पंचायत उपाध्यक्ष ललितजी बरछा, अजमन राऊत, सौ.लताताई पूगांटे, सरपंच शिवप्रसाद गवरना सरपंच शेवंताताई हलामी, मूनिर शेख ,अध्यक्ष मो.शरीफ भाई कूरेशी यांनी मार्गदर्शन केले.

       या काय॔क्रमाचे संचालन पत्रकार ओम देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार सिताराम बडोदे यांनी केले त्याच बरोबर आलेले सर्व उपस्थित मान्यवरांना अल्पोहार व भोजनाचा काय॔क्रम आयोजित करण्यात आला होता.