ब्रेकिंग न्युज… — अमरावती चांदूरबाजार रोडवर शिराळा फाट्यावर ट्रक व बसचा भीषण अपघात… — ३५ ते ४० प्रवाशी जखमी असल्याची माहती…

रत्नदिप तंतरपाळे 

चांदूर बाजार तालुका प्रतिनिधि

           अमरावती चांदूरबाजार रोडवर शिराळा फाट्यावर जवळ बस आणि ट्रक चा भीषण अपघात घडला असून जाणाऱ्या बसला रेतीने भरलेल्या ट्रकने धडक दिली. 35 ते 40 प्रवासी जखमी प्राथमिक माहिती मिळाली असून जखमी प्रवाश्यांना चांदूरबाजार ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे तर काहींना अमरावती येथे उपचार घेत आहेत.

          मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीवरून चांदूर बाजारच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक ने राज्य परिवहन महामंडळच्या एस टी बस MH40 Y 5461 ला अमोरा समोर धडक दिली असून या धडकेत ३५ ते ४० प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की एस टी समोरील बाजू चकनाचूर झाली आहे.

          जखमींना चांदूरबाजार येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी रुग्णांना केले दाखल, तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अमरावती येथील रुग्णालयात उपचारासाठी रेफर केले.