उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
सोनू शेख यांनी इन्स्ट्राग्रामवर छत्रपती संभाजी महाराज यांचा बाबतीत अश्लील शब्दात पोष्ट टाकल्यामुळे देशद्रोहाच्या गुन्ह्यातंर्गत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी चिमूर येथे आज सकाळी मोर्चा काढण्यात आला होता.
तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी शिष्टमंडळाने निवेदन स्वीकारले व सदर निवेदन त्यांच्या मार्फत चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना पाठविण्यात येणार आहे.
चिमूर येथील सोनू शेख यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा बाबत ७ मार्च ला इन्स्ट्राग्रामवर अश्लील शब्दात पोष्ट टाकली,हि पोष्ट चिमूर येथील सुज्ञ व्यक्तींच्या लक्षात आली.त्यांनी सदर माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगाने लोकांपर्यंत पोहोचवली.
७ मार्च २०२५ च्या सोनू शेखच्या पोष्ट संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी हजारो नागरिक पोलिस स्टेशन चिमूर येथे पोहोचेल होते.
यामुळे सोनू शेख च्या पोस्टला अनुसरून चिमूर पोलिस स्टेशन मध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.याचबरोबर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा सुध्दा दाखल करण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की,राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा दिनांक ०७/०३/२०२५ रोजी इन्स्टाग्रामवर अश्लील शब्दात सोनू शेख चिमूर यांनी अपमानित केल्यामुळे त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.
उपरोक्त विषयांचे अनुषंगाने आपणांस सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात येत आहे की,दिनांक ०७/०३/२०२५ ला सोनू शेख चिमूर याने इन्स्टाग्राम वर अश्लील शब्दात लिहून राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केल्याने सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत.
त्यामुळे सकल हिंदु समाज संतप्त झालेला असून सोनू शेख, चिमूर या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला असल्याने त्यावर देशद्रोहाची कठोर कार्यवाही करावी अशी सकल हिंदू समाजाची मागणी आहे.
राजे छत्रपती संभाजी महाराज यांचे विषयी अश्लील भाषा इन्स्टाग्रामवर लिहीणे म्हणजे सकल हिंदु समाजाला भडकविण्याचा प्रयत्न करीत आहे,असे दिसून येत आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे निवेदनाचा विचार करून आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कठोर कार्यवाही करावी.यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना मोर्चा समाप्ती नंतर निवेदन दिले आहे.
श्रिहरी बालाजी देवस्थान ते चिमूर तहसील कार्यालय असा मोर्चेकरांचा प्रवासक्रम झाल्यानंतर मोर्च्याची सांगता करण्यात आली.




