राजे शिवछत्रपती प्रेरणा पुरस्काराने उमाकांत बागडंकर गुरूजी होणार सन्मानित… — आज ८ जून शनिवारला मलकापूर येथे होणार पुरुस्कृत…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशीवणी

पारशिवनी :- पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबूळवाडा येथील मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक उमाकांत बागडंकर गुरूजी यांची राजे शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कारासाठी निवड झालेली असुन त्यांना ८ जून शनिवार रोजी मलकापूर येथील तालुका शिक्षक संघ पतसंस्था हाॅल भा्तृमंडळ येथे राजे शिवछत्रपती प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

        माणुसकी मल्टिपर्पज मलकापूर जिल्हा बुलढाणा तर्फे राज्यस्तरीय राजे शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

          वसंत विठ्ठल पाटील सेवातिर्थ धाम वृध्दाश्रम दातांळा व संदीप इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक मलकापूर यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

         सदर पुरस्कार सामाजिक कार्यात व सामाजिक दायित्वासाठी उत्तम कार्य प्रेरणादायी उपक्रम पारशिवनी तालुक्यात राबविण्यात मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उमाकांत बागडंकर गुरूजी हे अग्रेसर असुन विद्यार्थ्यांना संस्कार शिबिराचे आयोजन करुन त्यांच्या बालमनावर संस्कार क्षम विचार रूजवण करून आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी घडवून राष्ट् ऊभारणिस मोलाची कामगिरी बजावली आहे.

              राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रभावित होऊन विद्यार्थ्यी ग्रामस्थांना ग्रामगीता प्रबोधन करणे व त्या अनुषंगाने ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात अग्रेसर असणारे पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबूळवाडा ( पारशिवनी)येथील मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक उमाकांत बांगडंकर गुरूजी यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन मलकापूर येथील माणूसकी मल्टिपर्पज फाऊंडेशन यांनी राजे शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कारासाठी निवड केली आहे.

            सदर पुरस्कार ८ जून २०२४ शनिवार ला मलकापूर येथील तालुका शिक्षक संघ पतसंस्था हाॅल भा्तृमंडळ येथे समारंभ सोहळ्यात देऊन गौरविण्यात येणार आहे.

          शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र पुष्पगुच्छ भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उमाकांत बांगडंकर गुरूजी यांची राजे शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सौ.अर्चना दिपक भोयर जिल्हा परिषद सदस्या पारशिवनी, पंचायत समिती सभापती सौ.मंगला उमराव नीबोंने, सुभाष जाधव गटविकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी, कैलास लोखंडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पारशिवनी, सौ. राजश्री ऊखरे प्राचार्या लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाबूळवाडा, डॉ. इरफान अहमद शेखगोपाल कडू सेवानिवृत शिक्षक.डॉ.प्रमोद भड, सुनील मस्के,इंद्रपाल गोरले,आदिनी अभिनंदन केले आहे.