ढोलकी वाजवत प्रहार संघटनेचे दर्यापूर तालुका कृषि कार्यालयात अनोखे आंदोलन…

 

युवराज डोंगरे/खल्लार

         दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिकविम्याची रक्कम व शेतकरी उपकरणे याबाबतची सबसिडी खात्यात जमा करण्यात यावी यासाठी दर्यापूर तालुका कृषि कार्यालयात मंडळ अधिकारी सचिन राठोड यांना ढोलकी वाजवत निवेदन सादर करण्यात आले.

          यावेळी कार्यालयात घोषणाबाजी करीत तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम व शेती उपकरणे याबाबतची रक्कम दि 1 जून 23 पर्यंत जमा करण्यात यावी असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी प्रहारचे बापूसाहेब साबळे,प्रदीप वडतकार, सुधिर पवित्रकार,गणेश अरबट,उमेश भुरे, रावसाहेब वडतकार, भैय्यासाहेब राऊत, बबनराव वडतकार, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.