RSS पुरस्कृत सर्व सनातन विचारसरणी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे सर्व दबाव गट आणि या वैचारिक विषातून 2014 पासून नव्याने बाळंत झालेले मोहन भागवत, मोदी, शहा, नड्डा आणि महाराष्ट्रात फडणवीस यांचा हा “भाजप ” राजकीय पक्ष……
आणि यांच्यासोबत जाणारे केंद्रात आणि इतर राज्यात जाणारे इतर सर्वच लहान / मोठे राजकीय पक्ष जसे की, चंद्राबाबू नायडू, नितीशबाबू, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि इतर सर्व साथीदार हे सर्व आजच्या घटनेला………
मा.भूषण गवई ( सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश )
यांच्यावर अर्थात संविधानावर बूट फेकणाऱ्या त्या वकिलाच्या दुष्कृत्यात प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षरित्या सामील झालेले आहेत. असाच याचा अर्थ स्पष्ट निघतो….!
आज आमच्या महाराष्ट्राची शान म्हणून महाराष्ट्र विधीमंडळाने मा.भूषण गवई साहेबांचा सत्कार विधिमंडळात कांही दिवसापूर्वी केला होता. त्यात सर्व EVM मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री उपस्थित होते…….
ते आज प्रशासकीय स्तरावर किंवा विधिमंडळात या घटनेचा निषेध करणार आहेत का…..?
आम्ही जनता आणि संविधाननिष्ठ जबाबदार नागरिक म्हणून या कृत्यविरोधात रस्त्यावर उतरूच……
परंतू , तुमचे काय….?
तुम्हाला सोडणार नाही.
कारण, या दुषकृत्यामागे तुमचाच सर्वांचा हात आहे. यात काही विदेशी शक्ती नाही. काळ्या कोटातला काळाच सनातनी तुम्ही तिथे उभा केलेला होता.
या दुषकृत्यामुळे आज देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी नाचक्की झालेली आहे की त्यांना प्रश्न पडत आहे की…….
” भ. बुद्ध, संत कबीर, छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज म. फुले, म. गांधी, पं. जवाहरलाल नेहरू , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, लाल बहाद्दूर शास्त्री इत्यादी महापुरुष आणि तत्ववेत्त्यांचा हाच देश आहे का…..?
ज्याच्या जन्माने अजून शंभरी सुद्धा गाठली नाही. पुन्हा हा कुसांस्कृतिक गुलामीत जातो का काय…..?
अशी अवस्था अंतराराष्ट्रीय स्तरावर आमची आज झाली आहे…….!
याला जबाबदार आम्ही भारताचे लोकं आहोत. कारण आम्ही अंधश्रद्धाळू धार्मिक कर्मकांडाच्या बाहेर न पडल्यामुळे, विज्ञानवाद न स्विकारल्यामुळे आमची मनुवादी कूविचारसरणीच्या गुलामीकडे वेगाने वाटचाल चालू आहे.
म्हणूनच, इथपर्यंत या सनातन्यांची मजल गेली आहे…………!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधानाला पुरता धोका ओळखून पुरोगामी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून रस्त्यावर उतरून तसेच संपूर्ण देशाने…….
निषेध करूनच या सनातनी विंचवाची नांगी ठेचलीच पाहिज……!
जरी…….
मा.भूषण गवई सर म्हणत असले की अशा वृत्तीला मी मनावर घेतही नाही आणि घाबरतही नाही. हे तुमचे वयक्तिक मत झाले……
परंतू , हे दुषकृत्य आम्ही भारताचे लोकं म्हणून आणि संविधानातील प्रास्ताविकेची जी आम्ही शपथ घेतो. ज्या संविधानाचे रक्षण करण्याची खरी संविधानिक जबाबदारी…….
सरन्यायाधीशांची आहे. एका व्यक्तीची नसून ती एक आमच्यासाठी गरिमा आहे.
त्या गरिमावर त्या वृत्तीने बूट फेकलेला आहे किंवा प्रयत्न केलेला आहे. तो कांही एक व्यक्ती किंवा माथेफिरू म्हणून नव्हे तर ती या देशातील 1818 च्या वेळी हरलेली वृत्ती आहे……!
” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तो मी मिळविणारच ” ही प्रतिज्ञा भंग झालेली वृत्ती आहे…….!
ही 1947 पूर्वीची गुलामीची आणि 1956 पूर्वीची मानसिक गुलामीच्या वृत्तीचा जळफळाट आहे…..!
कदाचित, आपल्या…….
मातोश्री 5 आक्टोबरच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाल्या असत्या, तर कदाचित ही घटना घडलीच नसती…..!
तुम्ही जे कांही संविधाननिष्ठ म्हणून भूमिका घेतली. ती निदान आज तरी आमच्यासाठी कौतुकास्पद आहे…..
आता आपला केवळ एक ते दीड महिनाच उरलेला आहे. तेंव्हा संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की, एकदा महाबोधी बुद्ध विहार आपल्या ताब्यात देण्याचा आदेश द्या…..
एकदा EVM ला हटवीण्याचा आदेश द्या…..
एकदा राजस्थानातील मनुचा पुतळा हटवीण्याचा आदेश द्या…………
बाकी आमच्यावर ( आम्ही भारताच्या लोकांवर ) सोडा…………
मग आम्ही बघतो की कसा पुन्हा एकदा या संविधानावर देश चालत नाही…!
पुन्हा एकदा या भ्याड हल्ल्याचा आपण सर्वांनी निषेध केलाच पाहिजे……
आम्ही औरंगाबाद येथे वरील पोस्टरप्रमाणे आज बैठक घेऊन कृतिआराखडा तयार करून रस्त्यावर उतरणार आहोत………….. तुम्ही सुद्धा…..



