Home Maharashtra आरमोरी येथील सहाय्यक वनसंरक्षक अविनाश मेश्राम यांचा निरोप समारंभ…

आरमोरी येथील सहाय्यक वनसंरक्षक अविनाश मेश्राम यांचा निरोप समारंभ…

प्रितम जनबंधु

    संपादक 

आरमोरी :- वनपरिक्षेत्र येथे कार्यरत असलेले वनक्षेत्राधिकारी श्री.अविनाश मेश्राम हे सन २०२० पासून कार्यरत होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अत्यंत चांगली सेवा प्रदान करून सर्वांना सोबत घेऊन काम करीत होते. जेव्हा आरमोरी परिक्षेत्रात पदभार स्वीकारला तेव्हा वाघाचे प्रमाण वाढून वन्यजीव – मानव संघर्ष पराकोटीला पोहचला होता अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आरमोरी परिक्षेत्राचा कार्यभार घेतला हे अतिशय आव्हानात्मक होते. वाघाचे हल्ले वाढत होते मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात होत होती.   

            वनविभागावर जनतेचा रोष वाढत होता सोबतच राजकीय दबाव यांना न जुमानता वनविभागातील कर्मचारी, वनमजूर, एनजीओ यांना एकत्र घेऊन नियोजनबध्द योजना आखली त्यामुळे वाघांवर नियंत्रण ठेवण्यास काही प्रमाणात यश आले.

           वनविभागाविषयी असलेला रोष कमी होत गेला. त्यानंतर ओरिसा येथून आलेल्या रानटी हत्तीचा कळप प्रचंड शेतीचे नुकसान होते त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असतानाही गावातील लोकांना घेऊन त्यांना पागावण्याचा प्रयत्न केला.

                        या तीन ते चार वर्षांमधील त्याची चांगली कामगिरी बघून त्यांची नुकतीच नवेगाव बांध येथे सहाय्यक वनसंरक्षक बढती मिळाली आहे. त्याची काम करण्याची पद्धत बघून आज आरमोरी येथील वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने सपत्नीक शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला.

              यावेळी वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाने, सहसचिव दिपक सोंकुसरे, सदस्य अंकुश गाढवे, राकेश सोनकुसरे, प्रवीण अंबादे उपस्थित होते.