कुलारच्या करंटने 13 महिन्याच्या बालकाचा मृत्यू , खल्लार येथील घटना…

युवराज डोंगरे

उपसंपादक

         खल्लार येथील 13 महिन्याच्या बालकास कुलरचा करंट लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल दि 6 सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास खल्लार येथे घडली.

         जियान शहा नासिर शहा वय 13 महिने असे मृत बालकाचे नाव असून काल दि 6 सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याला कुलरचा करंट लागला. लगेच उपचारार्थ खाजगी दवाखान्यात नेले. असता खाजगी डॉक्टरने अमरावतीला घेऊन जाण्यास सांगितले अमरावतीला खाजगी दवाखाण्यात उपचार सुरु असतानाच जियान शहा याचा मृत्यू झाला. मृतक जियान वर आज 7 सप्टेंबरला बेंबळा बु येथील कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.