शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील सावरी (बीड) येथे श्री.लक्ष्मण पाटील यांच्या शेतामध्ये पर्यावरण दिन संपन्न झाला.
यामध्ये सुरुवातीला पर्यावरणाचे महत्त्व समजून सांगण्यात आले,प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून जगवले पाहिजे असे मार्गदर्शन भूषण यांनी केले आणि त्यांच्या शेतात वृक्षारोपण करण्यात आले.

शेतीसाठी गांडूळ खताचा उपयोग कसा करता येईल याबाबत श्री.बानकर यांनी मार्गदर्शन केले.गांडूळ खताचा उपयोग केल्याने शेतीचे उत्पादन वाढवू शकते असे मार्गदर्शन त्यांनी केले.
त्यानंतर सावरी गटग्रामपंचायतचे सरपंच लोकनाट रामटेके यांनी पर्यावरण सूचक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिता पाटील होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून भूषण मुंजेकर,अमित बानकर,पोक्रा योजनेचे समन्वयक अक्षय तामसेकर,उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी विविध योजनेबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमांमध्ये किरण मेश्राम,वंदना वाडी सीएमआरसी सचिव,गटाचे अध्यक्ष उषाताई रामटेके,कविता पाटील,नरू धानोरकर,शितल पाटील,नितेश मसराम,सीमा दुर्वे,नाना घाणोडे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रंजू दुर्गे,वैशाली रामटेके यांनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे संचालन रंजू दुर्गे यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली रामटेक यांनी केले.


