Home देशविदेश पत्रकार म्हणजे काय?

पत्रकार म्हणजे काय?

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

        पत्रकारांचे अनेक पैलू आहेत,पत्रकारांचे अनेक विचार व अनेक भुमिका आहेत,यामुळे पत्रकार अनेक माध्यमांतून रेखाटला जातोय व ओळखला जातोय.

          पत्रकार म्हणजे केवळ डिग्री होल्डर नाही,पत्रकार म्हणजे केवळ उच्च शिक्षित नाही,तर पत्रकार म्हणजे समजदार,संवेदनशील,कार्यक्षम,संवेदनक्षम,निर्भिड,निष्पक्ष,स्वाभिमान,परिणाम,प्रभाव,सचोटी,व जनतेप्रती इमानदार पुर्वक जबाबदेही!…

        पत्रकार हा परिवर्तनशील असला पाहिजे.पण,समाजविघातक व देशविघातक संबंधाने धोकादायक वळण घेणारा नसावा.पत्रकार वैचारिक व मानसिक लाचार नसवा,गुलामी पत्करलेला जनतेप्रती शातीर शत्रु नसावा,.

      पत्रकार हा कुणीही असू शकतो,कुणीही होवू शकतो या मतासी बरेच सहमत नसणार!,”पण हे वास्तव नाकारून चालणार नाही.

         तद्वतच अडणी आणि कमी शिकलेल्या व्यक्तींच्या अकलेला,ज्ञानाला,हुशारीला,समजदारपणाला,संवेदनशीलतेला, सहकार्य भावनेला,सांभाळून घेणाऱ्या भुमीकेला,संबंध जपणाऱ्या कसबला,मैत्रीला,प्रेमाला,त्यांच्या श्रमाला,एकमेकांना सांभाळून घेणाऱ्या कर्तव्याला,वैयक्तिक स्तरावर समस्यांची सोडवणूक करणाऱ्या सद्भावनेला,कमी लेखन चालणार नाही.हाच व्यक्ती चालताबोलता योग्य भावनाप्रदान पत्रकार असतो हे केव्हा समजून घेणार?

        जो स्वत: बरोबर इतरांच्या हितासाठी बोलतो व लिहितो,जो स्वत:सह इतरांच्या संरक्षणासाठी लिहितो व बोलतो,जो स्वत:सह इतरांच्या हक्कांसाठी लिहितो व बोलतो,जो स्वत:सह इतरांच्या अन्यायाविरोधात लिहितो व बोलतो,जो भ्रष्ट्राचारांची प्रकरणे लेखणीच्या व बोलण्याच्या माध्यमातून जनतेसमोर आणतो,जो सत्ताधाऱ्यांच्या योग्य व अयोग्य भुमिका जनतेसमोर आणतो,जो सत्ताधाऱ्यांच्या योग्य व अयोग्य नितीवर लिहितो व बोलतो,जो सत्ताधाऱ्यांच्या योग्य व अयोग्य नियोजनावर बोलतो व लिहितो,जो सत्ताधाऱ्यांनी योग्य व अयोग्य बनविलेल्या कायद्यावर लिहितो व बोलतो,जो नागरिकांच्या-महिलांच्या- विद्यार्थ्यांच्या-शेतकऱ्यांच्या- बेरोजगारांच्या अधिकार-समस्यांवर लिहितो व बोलतो,जो आपापल्या क्षमतेनुसार एकमेकांना सहकार्य करतो,जो आपल्या बोली भाषेमध्ये एकमेकांना समजून घेतो,जो आपल्याला नातेवाईकांना-समाज बांधवांना-देशातील नागरिकांना समजून घेत सन्मान व आदर करतो,जो देशातील तमाम नागरिकांची सर्वोतोपरी आणि सर्वोत्तम उन्नतीसाठी लिहितो व बोलतो,जो देशातील नागरिकांना झगड्यात-भांडणात ओढत नाही,जो देशातील तमाम लोकांत खोट्या व बनवाबनवी उद्देशाला अनुसरून द्वेष पसरवित नाही,जो देशातील नागरिकांत सातत्याने ज्ञानाची भर घालत राहतो,जो देशातील नागरिकांत वास्तव व योग्य ज्ञानाचा संचय करतोय,जो छडयंत्रातून देशातील नागरिकांना बाहेर काढतो,जो वास्तविक घटना व घडामोडी अंतर्गत प्रकरणाची सत्यता बाहेर आणतो,आणि अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्दावर-विषयावर लिहितो व बोलतो,”तोच पत्रकार!…

          अशा प्रकारची वृत्ती व कृती भारत देशातील नागरिकांमध्ये आहे असे माणण्यास हरकत नसावी!,”म्हणूनच पत्रकार म्हणजे अन्यायाविरुद्ध बंड करून उठणारा आवाज!,सर्व समस्यांची सोडवणूक करण्यासाठी धडपडणारा वैचारिक उर्जावान स्त्रोत!…