बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी….
पिंपरी बुद्रुक ते नरसिंहपूर परिसरात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.दिवसभर शांततेत आणि सुरळीत वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली.
सदर निवडणूक दरम्यान जास्तीत जास्त मतदानाची नोंद झाली.सकाळ पासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या.महिला,युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हाक्क बजावला.
प्रशासनाने मतदानासाठी चोख बंदोबस्त ठेवला.सर्व मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.दुपारनंतर मतदानाचा वेग वाढल्याने आनेक केंद्रांवर गर्दी झाली.
तरीही निवडणूक यंत्रणेने नियोजनबद्ध पद्धतीने प्रक्रिया पार पाडत मतदान सुरळीत ठेवले.
मतदान केंद्रावर काही किरकोळ व तांत्रिक अडचणी निर्माण न होता,निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली.
मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदाची निवडणूक समाधानकारक टक्केवारी ठरली असल्याचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सांगितले.
नरसिंहपुर,एकूण मतदान 1797 पैकी झालेले 1252,, टणु एकूण मतदान 1818 पैकी 1386,,पिंपरी बुद्रुक,एकूण मतदान 1859 पैकी झालेले 1340,, गिरवी एकूण मतदान 1502 पैकी 1157,, ओझरे, एकूण मतदान 605 पैकी 457,, गोंदी, एकूण मतदान 903 पैकी 664,, लुमेवाडी, एकूण मतदान 2786 पैकी 2098,, गणेशवाडी, एकूण मतदान 1133 पैकी 927,,
सराटी एकूण मतदान 1937 पैकी 1450 आधी सर्व भागात एकूण मतदानापैकी झालेले मतदान आकडेवारी प्रमाणे असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर प्रत्येक गावच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे मतदान घडवून आणले.
आता सर्वांचे लक्ष मतमोजणी फेब्रुवारीला 9 तारखेच्या निकालाकडे लागलेले आहे.



