सहावे गांधी दर्शन शिबिर १० सप्टेंबर रोजी पुण्यात..  — महाराष्ट्र गांधी स्मारक निधी , युवक क्रांती दलाकडून आयोजन..

 

    दिनेश कुऱ्हाडे 

 उपसंपादक पुणे विभाग..

      पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात एकदिवसीय ‘ गांधी दर्शन शिबिर ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. 

         रविवार, दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात हे शिबीर गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे होईल. ‘गांधी दर्शन शिबिर ‘ मालिकेतील हे सहावे शिबीर आहे. 

          जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे ऑनलाईन भाषण उदघाटन सत्रात होणार आहे.

         ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार (गांधी समजून घेताना), डॉ.कुमार सप्तर्षी (सत्याग्रहशास्त्र), ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले(सावरकर तुलना) या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सशुल्क कार्यशाळा प्रवेशासाठी सुदर्शन चखाले ७८८७६३०६१५,संदीप बर्वे,९८६०३८७८२७,सचिन पांडुळे ९०९६३१३०२२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.