शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
शेतकरी सुखी तर जग सुखी असे म्हटले जाते या अगोदर राष्ट्रसंतांनी “मेरे देश के किसानोंको सुखी कर मजदुर को सुखी कर” असे राज्यकर्त्यांना सुनावले आहे.
तरीही या महायुती स्थीर सरकारचे शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष नाही.
राज्यकर्त्यांनो शेतकरी राबराब करून शेतीतून भरघोस उत्पादन घेतो परंतु त्यांच्या पिकविलेल्या शेत मालाचे भाव शेतकरी ठरवु शकत नाही.आणि तो दुसऱ्यावर अवलंबून असतो.
किमान मायबाप सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष केंद्रित करून उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
दरवर्षी शेतीचा वाढता खर्च वाढती मजुरी बि बीयाने किटकनाशके महागडे घेऊन शेतकरी शेती कसतो आणि उत्पादन घेतल्यानंतर या महागाईच्या भस्मासुरात शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम बरोबर मिळत नाही.
कवडीमोल भावात शेतमाल विकावा लागतो हे वास्तव विदारक चित्र आहे.त्यामुळे शेतकरी पुरता बेजार झाला आहे धान चना गहू तुरी लाखी सर्व शेतमालाचे भाव पाडल्याने सरकार प्रती शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे.
निवडणूकाच्या वेळी जाहीर नाम्यात बोलल्या प्रमाणे कर्जमाफी नाही धान बोनस नाही आणि शेतमालाला भावही नाही त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा अशा चक्रव्यूहात शेतकरी सापडला आहे, मार्च एंडीग आहे. सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे बजट बसेना अशा विवंचनेत सर्जा राजा शेतकरी सापडला आहे.
तेव्हा या गंभीर समस्येकडे मायबाप सरकारने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.



