Home देशविदेश खोटारडा आणि धूर्त प्रधानमंत्री देशाला आणि राज्याला मुख्यमंत्री लाभल्यामुळेच देशाचे व राज्याचे...

खोटारडा आणि धूर्त प्रधानमंत्री देशाला आणि राज्याला मुख्यमंत्री लाभल्यामुळेच देशाचे व राज्याचे वाटोळे :- अनंत भवरे संभाजी नगर..‌

         याला केवळ RSS जबाबदार नव्हे….

       तर प्रत्येक संविधानवादी बुद्धीजीवी वर्गाचे बोटचेपी धोरण आणि त्यांची स्वार्थातून निर्माण झालेली निष्क्रियता होय!

      परंतू,सर्वसामान्य भारतीय नागरिकांनो आता आपल्याला कुणालाही दोष देऊन, किंवा किंतु,परंतू,जर,तर चा विचार करुन आपली जबाबदारी झटकण्याची ही वेळ नव्हेच.ही वेळ कधीच निघुन गेलेली आहे.

         त्यासाठी सर्व संविधाननिष्ठ सर्वसामान्य जनतेतील युवापिढीने कर्तव्यातून सिद्ध होण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.

       त्यासाठी कोणत्याही सामाजिक संघटना व पक्ष यांच्यावर विश्वास न ठेवता ( कारण या सर्वांनीच केवळ आपला वापर करुन टाकून दिलेले आहे ) स्वबळावर एकाच संविधानिक विचाराने बांधिलकी घेऊन त्यात सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन एका नव्या क्रांतीची मशाल पेटवावी लागेल.

       सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आदरणीय मार्कंडेय काटजू म्हणतात की,” देशात एका फ्रेंच राज्यक्रांतीची आवश्यकता आहे. ” शिवाय आपल्या देशातील सर्वसामान्य जनतेत एक निष्क्रिय विचार सुद्धा पेरल्या जातो की, कोणत्या तरी सामाजिक संघटनेशिवाय किंवा पक्षाशिवाय क्रांती होऊ शकत नाही.

      यासाठी एक साधे स्पष्टीकरण देता येईल की,आमच्या देशात सामाजिक संघटना व राजकीय पक्ष हजारो असून सुद्धा आमच्या देशात असं का घडतं?

       राहिला प्रश्न सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांच्याशिवाय क्रांती घडू शकत नाही.तर मग यशस्वी फ्रेंच राज्यक्रांती घडत असतांना,अमेरिकन राज्यक्रांती घडत असतांना कोणती सामाजिक संघटना होती? कोणता राजकीय पक्ष होता?

      या क्रांत्या तर केवळ वैचारिक बुद्धीजीवी वर्गाने जनतेच्या बरोबरीने ( ना मागे,ना पुढे, सोबतीने ) खांद्याला खांदा लावून लढले.तेंव्हा ते यशस्वी होऊ शकले आणि क्रांत्या यशस्वी होऊ शकल्या…

         परंतू,आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या रक्तहीन संविधान क्रांतीला पुन्हा एकदा जागृतीतून कृतीचा अविष्कार करण्यासाठी मातीत गाडून घ्यावे लागेल. तेंव्हाच पुढील भविष्यातील पिढीचे भवितव्य उज्वल असेल.

        त्यासाठी प्रत्येकाने कृतीतून सिद्ध झाले पाहिजे.त्याची सुरुवात आपण आपल्यापासूनच सुरुवात करूया…. 

प्रथम कर्तव्य पुढीलप्रमाणे असतील…..

     (1) सर्वांनी मिळून येणाऱ्या 14 एप्रिल जयंतीच्या निमित्ताने संबंधित पोलीस अधीक्षक,पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना मिरवणुकीत डी.जे.वाजवीण्यासाठी बंदी आणण्याचे निवेदन देऊया.

      (2) मिरवणूक काढावी परंतू,त्यात केवळ महापुरुषांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम असावेत.

      (3) कोणत्याही गायनाचे कार्यक्रम न ठेवता ( पॆसे न देता ठेवता येत असतील तर ठेवावे ) विचारवंत आणि आचारवंताचे प्रबोधनातून कार्यक्रम जरूर ठेवावेत.

      (4) प्रबोधनातून केवळ प्रबोधन कर्त्याने धम्मक्रांती आणि संविधान क्रांतिचेच महत्व पटवून द्यावे. शिवाय त्यासाठी आज 2025 च्या काळात राज्यात आणि देशात जी सर्वच क्षेत्रात अघोषित आणीबाणीसारखी जी परिस्थिती निर्माण झाली आहे. तीला आम्हीच (आम्ही भारताचे लोक ) कसे जबाबदार….? आणि त्यावर आता काय उपाय असतील आणि ते कसे करता येईल याचे प्रबोधन त्याने जनतेला सोबत घेऊन कसे करता येईल.असे कृतिशील प्रबोधन कर्त्यांने नियोजन करावे. केवळ बेंबीच्या देठापासून नाटकी बोंबलू नये…!

        (5) कुणीही जबरदस्ती जयंतीची वर्गणी कुणालाही मागू नये.ज्यांनी आम्हाला कुणालाही,कशासाठीही हात पसरू न देण्याचा स्वाभिमान शिकवीला. त्याच महापुरुषाच्या जयंतीसाठी आम्ही लाचार का व्हावं!

      ज्यांना कुणाला स्वैच्छेने, उत्स्फूर्तपणे द्यायचे असतील ते मंडळाकडे आणून देतील.आपण कुणाला का मागायचं?

       (6) जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थांमध्ये 18 तास अभ्यासाची स्पर्धा लावा.प्रथम येणाऱ्यास त्याने 18 तास अभ्यास कसा केला, यावर प्रश्न विचारून त्यांना बक्षिसे द्या….

        (7) दारू पिवून कार्यक्रमात येणाऱ्यांना प्रवेश देऊ नका….

       (8) कोणत्याही आजी,माजी नगरसेवक, आमदार,खासदार,नामदार यांना जयंतीला न बोलावता उलट आपल्यातीलच एखाद्या जेष्ठ वयस्कर निष्कलंक उपासक, उपासिकेच्या हस्ते ध्वजारोहण करा…

     अशा अनेक नैतिक नियमांचे पालन करुन इथून पुढे येणाऱ्या सर्व जयंत्या साजरी करूया….

       हीच सार्वजनिक कृती महापुरुषांना आपले अभिवादन असेल….

        हाचआमच्यातील बदल RSS / मोहन भागवत /मोदी /शहा / देवेंद्र फडणवीस अर्थात संविधान विरोधी शक्तीच्या छातीत धडकी भरवल्याशिवाय राहणार नाही….

        हाच तर संविधाननिष्ठ आंबेडकरवाद आहे…

           आवाहनकर्ता 

           अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,रेणापूरकर, औरंगाबाद 7875452689….