आरोग्य असेल तर मनुष्याला आनंद, सुख, शांती मिळतो:- आमदार कृष्णा गजबे

 

ऋषी सहारे

संपादक

 

देसाईगंज:

    आरोग्य असेल तर मनुष्याला आनंद, सुख, शांती यांची अनुभूती अगदी सहज घेता येते नाहीतर आजार आणि मानसिक त्रास सहन करून संपूर्ण आयुष्य जगावे लागते, असा आशय या प्रत्येकाने जीवनात स्वस्थ असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आपणांस सर्वप्रथम उत्तम आरोग्याचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे. त्यानंतर स्वतःचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य कसे सुधारू शकते आणि जीवनाचा आरोग्यदायी अनुभव कसा काय घेता येऊ शकतो हे देखील जाणून घ्यावे लागेल.असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

    सामाजिक कार्यकर्ता तथा टायगर ग्रुप तालुका अध्यक्ष शरद राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषद शाळा नैनपूर वार्ड येथे आयोजित नेत्र तपासणी व आरोग्य शिबीरामध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी मार्गदर्शन केले. 

   यावेळी आमदार कृष्णा गजबे, जेसा मोटवानी, राजू रासेकर, भाजपा बूथ प्रमुख चौपंदास विधाते, भाजपा बूथ प्रमुख प्रिन्स अरोरा, विक्की रामाणी, क्षितीज उके, विलास लोखंडे, रामदास मसराम, राहुल पुस्तोडे, मिलिंद उईके, मेरी विल्सम, मेश्राम सर, कपिल बोरकर, कुंदन बुराडे, सागर वाढई, जावेद शेख, अतुल दूनेदार, पराग रेकडे, शिवणकर सर व समस्त टायगर ग्रुप पदाधिकारी व मित्र परिवार उपस्थित होते.