जनतेचे अडीअडचणीत आर्थिक मदत करणारे नेते… — आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष व अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

गडचिरोली : पद असो किंवा नसो नेहमीच जनतेच्या अडीअडचण असो किंवा कोणत्याही समाजाच्या धार्मिक सण,उत्सव असो त्याच्याकडे तक्रार,मागणी अडचण सांगत गेलेल्या नागरिकांना फूल नाही तर फुलांची पाकळ्याच्या तरी मदत केली जाते,आज पद नाही पण प्रतिष्ठा आहे,कित्येक नागरिक आपआपले अडचणी,समस्या घेवुन येत असताना ते निराकरण करण्यासाठी तत्पर आहेत.

       अलिकडे वैद्यकीय उपचाराचा खर्च सर्वसामान्य नागरिकांच्या कल्पने पलिकडे गेला आहे. त्यात एखाद्याची आर्थिक स्थिती बेताची असेल तर त्याला देव आठवल्याशिवाय राहात नाही.अशावेळी कोणी मदतीसाठी धाऊन आला तर तो देवदुतासारखा वाटतो.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी वेगवेगळ्या तीन रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करत दानशूरतेचा परिचय दिला.

       तालुक्यातील वेलगुर येथील मनीराम कासेवार हे काही दिवसाअगोदर चक्कर येऊन खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.त्यामुळे त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले,परंतु घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण येत होती.मनीराम कासेवार यांच्या प्रकृतीची माहिती वेलगुर येथील आदिवासी विद्यार्थीस संघाच्या सदस्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांना दिली.कंकडालवार यांनी कासेवार यांच्या भाऊंना अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात बोलावून उपचार करण्याकरिता आर्थिक मदत केली.

       येवढ्याचे नाही तर येरमनार येतील मडावी कुटुंब तेंदुपत्ता तोडयला जंगलात घेले व त्याचा घराला अचानक आग लागून सम्पूर्ण घर व घरातील जीवनावश्यक वस्तु आगीत भस्म झाले अशा वेळी दस्ततूरखुद येरमनार जावून सदर कुटुंबाला जीवनावश्यक व आर्थिक मदत करत लोकप्रतिनिधिने अशा वेळी सामन्या जनतेला मदत करावी असे प्रतिपादन केले होते.अशा एक ना अनेक समस्या ग्रस्त नागरिकांसाठी दिवसरात्र तत्पर असणारे नेते असल्याचं चर्चा जनसामान्यांमध्ये गूंजत आहे.यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, गुलाब देवगळे ग्रा.पं.सदस्य छल्लेवाडा, बाल्या वडेट्टीवार, सुनील कासेवार, विनोद रामटेके, राजाराम दुर्गे, सुनील रत्नम, विलास बोरकर, राकेश सडमेक व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नागेपली येथील गुळदे व आलापल्लीच्या शेख कुटुंबालाही मदत

        अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या मंगेश बाळकृष्ण गुळदे यांची तब्येत ठीक नव्हती.उपचार घेण्यासाठीही त्यांना पैशाची अडचण होती. गुळदे यांच्या प्रकृतीची माहिती नागेपल्ली येथील आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी अजय कंकडालवार यांना दिली.त्यामुळे मंगेश यांची आई अंजना बाळकृष्ण गुळदे यांना अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात बोलवून रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत केली.

       तसेच आलापल्ली येथील शेख कासम शेख अब्बास यांची प्रकृती ठीक नसल्याने चंद्रपूरमध्ये उपचार सुरू आहेत.घरची परिस्थिती चांगली नसल्याने उपचारासाठी आर्थिक अडचण होती. कार्यकर्त्यांनी याबाबतची माहिती देताच शेख कासम यांचा मुलगा इकराम शेख यांना अहेरीतील जनसंपर्क कार्यालयात बोलवून पुढील औषधोपचाराकरिता आर्थिक मदत केली. यावेळी सलीम शेख, सलाम शेख, माजी जि.प.सदस्य अजय नैताम, अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, विनोद रामटेके, रवी भोयर, राकेश सडमेक यांच्यासह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.