भाजप खासदार अशोक नेते यांच्या वाहनाचा भीषण अपघात..  — खासदार नेते सुदैवाने बचावले..

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी 

        गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाचा आज सकाळच्या सुमारास  भीषण अपघात झाला,सुदैवाने नेते या अपघातात बचावले. त्यांच्या गाडीने ट्रकला हलकासा धक्का दिला असल्याचे समोर आले आहे.

        सकाळी १० वाजताच्या सुमारास गडचिरोली मतदार संघाचे भाजप खासदार अशोक नेते हे नागपूर वरून गडचिरोली कडे जाण्यासाठी वाहन क्रमांक MH-३३,AA-९९९० ने निघाले होते.

       पाचगाव जवळ पोहचल्यावर अचानक त्यांच्या वाहनात बिघाड झाल्याने चालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटले,आणि वाहन ट्रकला जोरात धडकले.

       या धडकेत वाहनांचे एअर बॅग्स खुलल्याने खासदार अशोक नेते बचावले,वाहनात त्यांच्यासोबत असलेले इतर ४ जण सुखरूप असल्याची माहिती आहे.