मानव सेवा मंडळाचा पहिला वर्धापन दिन ग्रीनफ्रेंड्सच्या ‘नेचर पार्क’ वर उत्साहात साजरा… — वर्धापनदिन निमित्ताने केले ‘नेचर पार्क’वर वृक्षारोपण… 

 

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

लाखनी:-

  लाखनी बसस्थानकावरील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने तयार केलेल्या ‘नेचर पार्क’वर सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांनी मागील वर्षी एकत्रित येवून मानव सेवा मंडळाची स्थापना केली. या मानव सेवा मंडळातर्फे अनेक विविध उपक्रम घेतले जात असून यात लाखनी शहरात ‘माणुसकीची भिंत’ लाखनीत तीन ठिकाणी उभारण्यात आली.याद्वारे गरजूंना विविध निरुपयोगी कपडे, जीवनावश्यक वस्तू दान केले जातात.सकाळी सर्व सदस्याद्वारे योग, फिरणे ,कवायत ,शारीरिक तसेच नृत्य व्यायामाद्वारे शारीरिक सुदृढता व निवृत्तीनंतरचा विरंगुळा तसेच मनोरंजन नेचर पार्कवर केले जाते. याचबरोबर विविध पर्यावरण विषयक उपक्रम ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबच्या सहकार्याने राबवून वृक्षारोपण कार्यक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धन तसेच स्वच्छता अभियान सुद्धा वेळोवळी राबविले जाते.विविध दूर निसर्गरम्यठिकाणी सहलीचे सुद्धा आयोजन केले जाते तसेच कौटुंबिक स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन गुरुकुल आय.टी.आय येथे अनेकदा केले जाते. एवढेच नव्हेतर मानसिक विकलांग,निराधार,वेडसर लोकांची सेवा मेजर ऋषी वंजारी व गुरूकुल आयटीआयचे प्राचार्य खुशालचंद्र

 मेश्राम मानव सेवा मंडळाच्या वतीने सतत सेवा करुन त्यांना प्रेम माणुसकी दाखवून माणसात आणण्याचे कार्य करीत असतात.या मंडळात 38 वर्षापासून 81वर्ष वयोगटाचे 35 सदस्य हिरीरीने व अत्यंत आनंदाने सकाळचा एक तास योग व्यायाम,शारीरिक व्यायाम,नृत्य व्यायाम व कवायतीमध्ये घालवीत असतात.एव्हढेच नव्हेतर मानव सेवा मंडळाच्या सदस्यांच्या कुटुंबातील तिन्ही पिढीतील सर्व सदस्यांचा जन्म वाढदिवस ,लग्न वाढदिवस सुद्धा उत्साहात ‘नेचर पार्क’ वर साजरा केला जातो. याचबरोबर सामुदायिक प्रार्थना घेऊन समाजाप्रती ,पर्यावरणाप्रती आत्मचिंतन करून शपथ घेतली जाते.अशा या विविध उपक्रम आखणाऱ्या ‘मानव सेवा मंडळा’ला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाल्याने पहिला वर्धापनदिन कार्यक्रम ‘ नेचर पार्क’वर केक कापून तसेच वृक्षारोपण करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.यावेळी सर्वच सदस्यांनी नृत्य व्यायामाद्वारे ठेका धरून वर्धापनदिनाचा जल्लोष तरुणांच्या उत्साहाने साजरा केला. यानंतर सर्वांना अल्पोहार व ज्युस देऊन सर्वानी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन आलिंगन दिले.यावेळी ऍड. शफी लद्धानी,भीमराव गभने, रमेश गभने, विद्यमान जाधव,गोपाळ बोरकर, वसंता मेश्राम,नरेश इलमकर,विनायक कावळे,डॉ.पंढरी इलमकर, दुलीचंद बोरकर, ज्ञानेश्वर गिर्हेपुंजे, ताराचंद गिर्हेपुंजे,रामकृष्ण शिंदे साहेब,प्राचार्य धनंजय तिरपुडे,पुरूषोत्तम मटाले , शिवलाल निखाडे, माणिक निखाडे,सुनील खेडीकर,अशोक हलमारे, अशोक धरमसारे, ,टोलीराम सार्वे,गुरुकुल आयटीआयचे प्राचार्य खुशालचंद्र मेश्राम,संदीप मेश्राम,ऋषी वंजारी,चांगदेव वंजारी,मधुकर गायधनी, रतीराम गायधने, डॉ दिलीप अंबादे,दिलीप निर्वाण,ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे अध्यक्ष अशोक वैद्य, ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने,ग्रीनफ्रेंड्सचे सक्रीय सदस्य सर्वश्री अशोक नंदेश्वर, मंगल खांडेकर, मारोतराव कावळे इत्यादींनी मानव सेवा मंडळाच्या वर्धापनदिन कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.