Home Maharashtra श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यानिमित्य दर्यापूरात आढावा बैठक…

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यानिमित्य दर्यापूरात आढावा बैठक…

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक 

        दरवर्षीप्रमाणे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तिथीनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येते त्याच अनुषंगाने 4 मार्च रोजी दर्यापूर येथे आढावा बैठक पार पडली.

            येणाऱ्या 17 मार्च ला तिथीनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी दर्यापूर येथील आ गजानन लवटे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये बैठक घेऊन शिवजयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली.

            यामध्ये पंकज राणे अध्यक्ष म्हणून तर किशोर टाले, सरपंच मोहन, बायस्कार सरपंच,तर सदस्य म्हणून गोपाल अग्रवाल शहरप्रमुख, दिपक बगाडे, नकुल गुजर, प्रशांत ठाकूर, खंडू पाटील राऊत, आशिष लायडे, धनंजय पवार, रुपेश मोरे तर कोषाध्यक्ष म्हणून शरद आठवले व निलेश पारडे तर समितीचे मार्गदर्शक म्हणून बबनराव विल्हेकर विधानसभा संघटक, गुणवंत पाटील गावंडे व प्रमोद धनोकार तालुकाप्रमुख यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली तो सोहळा अतिशय दिमाखदार व्हावा यासाठी सर्वांनी मेहनत करून कशी चांगल्या प्रकारे होईल असा प्रयत्न करावा असे ठरविण्यात आले.

           त्यावेळी जयंती साजरी करण्यासाठी सर्व विषयावर चर्चा करण्यात आली त्यावेळी प्रमोद धनोकार,बबनराव विल्हेकर, गोपाल अग्रवाल,किशोर टाले,मोहन बायस्कार, गुणवंत पाटील गावंडे,आशिष लायडे,धनंजय पवार,रुपेश मोरे,पंकज राणे,खंडू पाटील राऊत,नकुल गुजर,रामसिंग साळुंके,संजय घरडे,दिलीप डालके,शरद आठवले,दीपक बगाडे,निलेश होले,पद्माकर राऊत,प्रशांत भांगे,जगदीश उंबरकर,भास्कर धोटे,शिलवंत रायबोले,निलेश पारडे इत्यादी उपस्थित होते.