लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार नोंदणी आवश्यक.:- जिल्हाधिकारी…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी परशिवणी

पारशिवनी :- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार हा महत्वाचा घटक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदार नोंदणी करून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

           जिल्हाधिकारी कार्यालय नागपुर , तहसील कार्यालय पारशिवनी व मानव विकास सेवा बहुउद्देशिय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पारशिवनी तालुका तिल कन्हान येथील तारसा रोड एम जी नगर कन्हान येथिल नेहा प्राथमिक विद्यालय च्या सभागृहात मतदार नोंदणी व विविध प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी जिल्हाधिकारी डा. विपिन ईटनकर बोलत होते..

             जिल्हाधिकारी कार्यालय नागपुर , तहसील कार्यालय पारशिवनी व मानव विकास सेवा बहुउद्देशिय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कन्हान येथील एम जी नगर तारसा रोड कन्हान येथिल नेहा प्राथमिक विद्यालया च्या सभागृहात मतदार नोंदणी व विविध प्रमाणपत्र वितरण करण्या साठी भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

          उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, नायब तहसीलदार रमेश पागोटे, मानव विकास सेवा बहुउद्देशिय संस्थेचे जिल्हाध्यक्ष विनोद पवार, शंकर इनवाते, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र राऊत, नगर अध्यक्ष करुणा आष्टनकर यावेळी उपस्थित होते.

           शासन च्या शिबीरात भटक्या विमुक्त जाती, अनुसूचित जाती, जमाती, मांग,गारुडी समाजा च्या कुटुंबातील वंचित घटकांना विविध प्रमाण पत्राचे वाटप जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

            शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्व नागरिकांना व्हावा या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

           शिबीरात आरोग्य विभाग, सजंय गांधी निराधार योजना, महसूल विभाग, निवडणूक शाखेने स्टॉल लावून नागरिकांना विविध योजनांचा लाभ दिला असून त्यामध्ये आधार कार्ड – 139, जातीचे प्रमाणपत्र – 31, उत्पनाचे दाखले-9, शिधापत्रिका – 9, रहिवासी दाखले – 110, वयाचे दाखले 95 लोकांना दिले असून निवडणूक शाखेने 92 मतदारांची नोंदणी यावेळी केली. 

            या शिबिराला कन्हान परिसरातील सत्रापुर कुशाजी नगर विवेकानंद नगर एम जी नगर व कन्हान परिसरातील नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.