चंदना दहिकार विद्यालयातून प्रथम.

रुपेश बारापात्रे 

शहर प्रतिनिधी

        आरमोरी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या वतीने फेब्रुवारी मार्च 2023 इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने नुकताच जाहीर करण्यात आला यामध्ये सरस्वती विद्यालय पळसगाव मध्ये पाथरगोटा येथील कु. चंदना पुरुषोत्तम दहिकार या विद्यार्थिनीने 82.60% गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. 

     अतिशय बिकट परिस्थितीतून शिक्षण घेऊन आज चंदना ने गुणांची टक्केवारी सह प्रथम येण्याचा मान मिळविल्याने गरीब आई वडिलांच्या मेहनतीला यश आल्याचे दिसून येत आहे. 

        या यशाचे श्रेय चंदना ने आपले आई वडील, इंदिरा शिक्षण संस्थेचे संस्थापक सुधीर भातकुलकर, प्राचार्य हेमंत बोरकर, वर्ग शिक्षक व शिक्षकवृंद पळसगाव यांना दिले आहे.