गोविंदपुर येथिल सरपंचाचे हेकेखोरपणामुळे महिला ग्रा.प. सदस्य कार्यक्रमापासुन वंचीत..

 

कैलास गजबे- करजगाव 

चांदुरबाजार तालुक्यातिल गोविंदपुर या ठिकाणी दिनांक ३१/०५/२०२३ ला राणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा शाशनाचे नियमानुसार कार्यक्रम घेण्यात आला परंतु या कार्यक्रमाची कुठल्याही प्रकारची माहीती ग्रामपंचायत महीला सदस्य सौ.अर्चना कै.गजबे यांना दिली नाही इतर सदस्यांना माहीती दिली व कार्यक्रमाला फोन लावून बोलविले मग एकाच सदस्याला कार्यक्रमाला का बोलविले नाही यावरुन गोविंदपुर ग्रामपंचायत सरपंचाची मानसिकता लक्षात येते सरपंच्याच्या अशा हेकेखोरपणामुळे महिला सदस्य यांना या कार्यक्रमापासुन वंचीत ठेवण्यात आले.महीलांचा कार्यक्रम असुन महीला सदस्य यांना या कार्यक्रमापासुन वंचीत ठेवण्यात आले तरी वरीष्ठ अधिकारी यांनी अशा हेकेखोर सरपंचावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गोविंदपुर ग्रा.प.महीला सदस्य सौ.अर्चना कै.गजबे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

 अहिल्याबाई होळकर जयंतीच्या कार्यक्रमाची गावामध्ये मुनादी देण्याकरीता सांगीतले होते.

 एस.एम.रेखाते 

सचिव ग्रा.प.गोविंदपूर

      सरपंच 

सचिन गो. सोलव 

फोन उचलला नाही.