उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर :-
भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2017 बॅचच्या असलेल्या वसुमना पंत यांनी शुक्रवारी (दि. 3 मार्च २०२६) चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ.नितीन व्यवहारे,निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार,चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम,उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर यांनी नूतन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सन 2017 मध्ये नागरी सेवेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी नंदुरबार येथे उपविभागीय दंडाधिकारी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. या कालावधीत त्यांनी आदिवासी समाजाचे कल्याण व सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.
त्यानंतर त्यांनी वाशीम जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले.ग्रामीण विकास प्रकल्प व विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
याशिवाय फलोत्पादन संचालक तसेच वनामती संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून तसेच नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे.


