झोपलेल्या इसमावर जिवघेना हल्ला..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी :- पारशिवनी येथील वार्ड क्र.४ अंतर्गत ढिवर मोहल्ल्यातील रहिवासी मारोती हरिचंद केळवदे वय ७० वर्षे सोमवार रात्री घरी छपरात झोपला असतांना अंदाजे दिड वाजताच्या सुमारास आरोपीने लोखंडी सब्बलने जिवघेना वार करुन गंभीर जखमी केले असल्याची धक्कादायक घटना घडली.

      नामदेव मोहनकर वय ६० वर्षे राहणार वार्ड नं.४ पारशिवनी असे आरोपीचे नाव आहे.जख्मी मारोती सहकुटुंब वार्ड क्र.४ पारशिवनी येथे राहतो.घटनेच्या दिवसी डिलिव्हरी साठी आलेली मुलगी आशा व पत्नी हिराबाई जेवण करुन घरात झोपले होते तर मारोती छपरात खाटेवर झोपला होता.

           मंगलवारला मध्यरात्री मारोती झोपेत असतांना घरा समोर राहत असलेला मारोतीचा आतेभाऊ नामदेव मोहनकर हा रात्रो दिड वाजता दरम्यान लोखंडी रॉड (सब्बल) घेवून गेला आणि डोक्यावर व कपाळावर,हातावर सपासप वार केले.

        मारल्याचा आवाज मुलगी आशाला आल्याने पत्नी व मुलगी घराबाहेर आले तर आरोपी नामदेव हातात लोखंडी रॉड (सब्बल) घेवून पळून जातांना दिसला.

       तेव्हा पत्नी हिराबाईने पतीजवळ जावून पाहिले तर मारोती गंभीर रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे दिसून आले.हि माहिती भाचा विनोद मोहनकर यांना दिल्यावरुन तो झोपेतून उठून आला.तसेच सचिन मोहनकर व पुतण्या अनिल केळवदे हे आले व जखमीस उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पारशिवनी येथे दाखल केले.

       गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी शासकीय मेडिकल नागपूर येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. हा प्रकार पारशिवनी पोलीसात पोहोचला तेव्हा फिर्यादी पत्नी हिराबाई मारोती केळवदे ने तक्रारीत सांगितले की,आरोपी नामदेव मोहनकर दारुच्या व्यसनी असल्याने गेल्या तीनचार महिन्यापासून एकटा राहत आहे.

        आणि मारीतीचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे म्हणत होता.यामुळे त्याला एक दिवस जिवे मारीन अशी धमकी देत होता.त्यावरून मारण्याचा प्रयत्न केला असे तक्रारीत सांगितले.

      जखमीवर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. 

      आरोपीस अटक करून तपासात घेतले आहे व आरोपी विरुद्ध भांदवी कलम ३०७,४५२ अन्वये गुन्हा दाखल केला.पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेकुमार थोरात यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि.शिवाजी भदाने टिम सह करीत आहे.