इंदापूर तालुक्यातील गरीब व गरजू महिला फॅशन डिझाईनच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी माझे प्रयत्न.:- लता टाकळकर.. — “तर,अनेक गरजू महिलांच्या जीवनातील व्यवसाय म्हणून फॅशन डिझाईनची उत्कृष्ट कामगिरी…

 

 

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

नीरा नरसिंहपुर परिसरातील गरजू महिला व मुलींसाठी ड्रेस व ब्लाउज फॅशन डिझाईनच्या क्लासेस अंतर्गत माहिती साठी बावडा ते नरसिंहपुर परिसरात प्रशिक्षण साठी दाखल होते. ,,पुणे येथील उत्कृष्ट लेखिका व फॅशन डिझाईन उत्कृष्ट कामगिरी आसवलेल्या लता महादेवराव टाकळकर या फॅशन डिझायनर लेखिका आणि समाज सेविका आहेत.

गेली 36 वर्षापासून शिवण कामाचे प्रशिक्षण गरजू महिला व मुलींना देऊन आनेक महिला स्वावलंबी बनवल्या आहेत.त्या महिला स्वता उत्तम व्यवसायिक बनल्या.

अर्पण सुप्रिया ड्रेस व ब्लाऊजचे पुस्तक स्वाता लेखन या पुस्तकामध्ये करून साधी व सोपी बोली भाषा ठोक टाळा पद्धतीचे पेपर कटींग केले आहेत.

या महिलांना त्याचा पुरेपूर उपयोग झाला. त्यांनी स्वतःचे क्लासेस सुरू केलेले आहे. अनेक महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे हेच लता टाकळकर यांचे ध्येय आहे.

प्रापंचिक वेळात वेळ काढून काम करून महिलांना रोजगारासाठी संधी मिळवून दिलेली आहे . म्हणूनच कामाची पावती म्हणून आनेक पुरस्कार मिळाले.

सावित्री बाई जीवन गौरव पुरस्कार पण समाजाने दिला हेच टाकळकर यांचे प्रामाणिक पणे कामाचे यश आहे.अनेक गावामधे महिलांना सोप्या भाषेत प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या प्रपंचासाठी पोट भरण्याचे साधन या शिवण कामानेच दिले आहे.

सर्व काम करीत आसताना पतीराज महादेव टाकळकर, सुमित व सुचित्रा, सह अनेकांची साथ मिळाल्या मुळे गोर गरीब गरजू महिलांन पर्यंत पोहोचून गरीब कुटुबांतील महिलांचे प्रपंचा उभा केला.