प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
विनोद खोब्रागडे यांनी दाखल केलेल्या फौजदारी पिटिशन अन्वये कायद्याच्या बाहेर जाऊन नियमबाह्य व बेकायदेशीर काम करणारे वरिष्ठ अधिकारी,बिल्डर,खनिज माफिया,यांचे धाबे दणाणले असतानाच बल्लारपूर न्यायालयात बिल्डर व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणारी फौजदारी पिटिशन दाखल करण्यात आल्याने खडबड उडाली आहे.
अन्याय ग्रस्त आदिवासी बांधवांनी व इतर शेतकऱ्यांनी गुंडांना न डगमगता पुढे यावे,असे आवाहन संघर्षी आयु. विनोदकुमार खोब्रागडे पटवारी जबाबदार-जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी आणि संविधानाचे अभ्यासक यांनी केले होते.तद्वतच पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असेही सांगितले होते.
त्यांच्या आवाहनाला महत्व देत अखेर आरोपी बादल खुशालराव उराडे,श्रीहरी भद्राया अंचुरी,सह दहा आरोपी विरुद्ध बल्लारपुर न्यायालयात,आदिवासी श्री.सुघोष पांडुरंग महेशकर व त्यांचा मुलांनी फौजदारी पीटिशन दाखल केली.
यामुळे अवैध असलेले प्लाॅट घेणारे अनेक प्लाॅट धारक अडचणीत येणार आहेत.
महसूल अधिकारी यांनी सुद्धा आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे अट्रासिटीचा कलम ४ नुसार तहसीलदार बल्लारपूर,उपविभागीय अधिकारी बल्लारपुर,जिल्हाधिकारी चंद्रपूर,तलाठी बलारपुर,मंडळ अधिकारी बल्लारपुर,आणि ठाणेदार बल्लारपुर यांच्यावर सुद्धा कलम ४ नुसार अट्रासिटीची कारवाई करण्याची मागणी न्यायालयात आदिवासी सुघोष पांडुरंग महेशकर व त्यांच्या मुलांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी,बादल खुशालराव उराडे व त्यांचे वकील मंडळी अँड.जुनारकरवर चंद्रपूर जिल्हा न्यायालयात बनावट बोगस खोटे दस्तऐवज आधारे शपथपत्र करून १ करोड ३५ लाख ७७ हजार ७३५ रुपये हडप करण्यासाठी खोटे शपथपत्र केल्यामुळे फिर्यादी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक वरोरा (चंद्रपूर) यांनी फौजदारी पीटिशन दाखल केली आहे.याबाबत दिनांक १६/०१/२०२५ ला सुनावणी आहे.
बामणी ग्रामपंचायत येथे सुद्धा आदिवासीची जमीन बेकायदेशीर बळकावली असल्याबाबत अनेक तक्रारी त्यांचा विरुद्ध येत आहेत.
राजुरा तालुक्यात व शहरात सुद्धा आदीवासी जमीनीवर अवैध प्लाॅट पाडून सरास ताबा पावती आधारे विकने सुरू असल्याचे विनोद खोब्रागडे यांचे म्हणणे आहे.
अन्यायग्रस्त आदिवासी व इतर शेतकऱ्यांनी न डगमगता न्याय व हक्कासाठी पुढे यावे असे आवाहन विनोदकुमार खोब्रागडे पटवारी यांनी केले आहे व तुम्हचा पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे, असेही सांगितले आहे.
दिनांक,०१/जानेवारी /२०२५ रोजी श्रमिक पत्रकार भवन चंद्रपूर येथे बल्लारपुर आदिवासी प्रकारणात पत्रकार परिषद घेन्यात आली होती व इशारा दिला होता.
श्री.सुघोष पांडुरंग महेशकर व त्यांच्या दोन मुली दोन मुले सह विनोद खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
बल्लारपूर शहरातील श्री.सुमेध पांडुरंग महेशकर यांच्या वडिलोपार्जित आदिवासीची जमीन गट नंबर ३१/६० क्षेत्र १.६२ अर्थात चार एकर जमीन अहंस्तातरणास मनाई असे ७/१२वर लिहून असतानाही,शासनाकडून कुठलीही परवानगी न घेता ९१ प्लाॅट अवैध पाडुन ३५० रुपये चौरस फूट प्रमाने ५ ते ६ लाख रुपये घेऊन ताबा पावती नोटरी करुन सरास आरोपी श्री.बादल खुशालराव उराडे,श्रीहरी भद्राया अंचुरी,शामली श्रीहरी अंचुरी व सुमित चंदू डोहने,हे महसूल अधिकारी यांच्या माध्यमातून अवैध प्लाॅट विकत आहेत व अनेक प्लाॅट खरेदी धारकांची फसवणूक केली आहे.
महसूल अधिकारी तहसीलदार बल्लारपूर,उपविभागीय अधिकारी बल्लारपुर,जिल्हाधिकारी चंद्रपूर,मंडळ अधिकारी बल्लारपुर,तलाठी बल्लारपुर, यांना पुराव्यानिशी गंभीर तक्रार देऊनही कुठलीही अँक्शन आरोपी विरुद्ध घेतली नाही.
पोलिस प्रशासन यांना सुद्धा गंभीर रिपोर्ट देऊनही त्यांनी कुठलीही अँक्शन घेतली नाही..
म्हणूनच आरोपी श्री.बादल खुशालराव उराडे सह अनेक महसूल अधिकारी व पोलिस प्रशासन यांना आरोपी करून त्यांच्या विरुद्ध फौजदारी खटला बल्लारपुर न्यायालयात दाखल झाला आहे.
सदर प्रकरणात FIR रजीष्टर करून सखोल चौकशी करून आरोपी श्री.बादल खुशालराव उराडे व इतरांची मालमत्ता जप्त करावी अशी मागणी पीटिशन मध्ये फिर्यादी सुघोष पांडुरंग महेशकर,किंतुशा प्रकाश गडपायले,नयना अमोल उईके यांनी न्यायालयात केली आहे.
श्री.बादल खुशालराव उराडे यांनी बामणी ग्रामपंचायत अंतर्गत अनेक आदिवासींची जमीन हडप केली आहे,अशी माहिती विनोदकुमार खोब्रागडे यांना फोन द्वारे दिली आहे..
बल्लारपूर या शहरात साधे स्टॅम्प पेपर वर ताबा पावती करुन अनेक प्लांट धारकांची फसवणूक श्री.बादल खुशालराव उराडे व इतरांनी फसवणूक केली आहे व हा २० ते २५ लाखांच्या कार मध्ये फिरत असुन,अनेक आदिवासींच्या जमीन नियमबाह्य व बेकायदेशीर कायद्याच्या बाहेर जाऊन विकल्यात आणि अमाप संपत्ती गोळा केली आहे व करोडपती झाला आहे.
याबाबत सखोल चौकशी करून संपूर्ण प्रापर्टी CBI,ED,ACB,मार्फत जप्त करावी अशी मागणी फौजदारी पीटिशन मध्ये केली आहे.
सुघोष पांडुरंग महेशकर,(आदिवासी बल्लारपुर) यांच्या वडिलोपार्जित शेत जमीन मौजा बल्लारपुर शहरात गट नंबर ३१/६० क्षेत्र १.६२ अर्थात चार एकर मध्ये ९१ अवैध प्लाॅट पाडून ५-६ लाख रुपयात नोटरी करुन रजिस्टर विक्री न करता ताबा पावती देत आहे व काही लोक घरे सुद्धा बांधत आहेत.
फिर्यादी सुघोष पांडुरंग महेशकर हा ७२ वर्षाचा वृद्ध आहे,त्यांना दोन मुली व दोन मुले आहेत,यांना विश्वासात न घेता मोठी मुलगी आंतरजातीय विवाह करुन निघून गेली.तिच्या माध्यमातून आरोपी गैरवापर करून त्यांना मालकी हक्कापासून वंचित करीत आहे.
मागील अनेक दिवसांपासून महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन यांना गंभीर रिपोर्ट देऊन कुठलीही कारवाई आजपर्यंत त्यांनी केली नाहीं.
अखेर पुन्हा आरोपी बादल खुशालराव उराडे बल्लारपुर व श्रीहरी भद्राया अंचुरी सह १० आरोपी यांच्या विरुद्ध फौजदारी खटला बल्लारपुर न्यायालयात दाखल झाला आहे.
बल्लारपूर न्यायालयात आरोपी श्री.बादल खुशालराव उराडे व इतर विरुद्ध फौजदारी खटला सुघोष पांडुरंग महेशकर व संपूर्ण कुटुंब यांनी बल्लारपुर न्यायालयात दाखल केला आहे.
बादल खुशालराव उराडे दस्तलेखक बल्लारपुर यांनी बल्लारपुर येथील आदिवासी सुघोष पांडुरंग महेशकर आदीवासी यांची जमीन अहंस्तातरणास मनाई असतांनाही बोगस ९१ प्लाॅट पाडून ५-६ लाखात नोटरी करुन विकत आहेत…
त्या सुघोष पांडुरंग महेशकर यांच्या दोन मुली व दोन मुले मागील अनेक दिवसांपासून तहसीलदार बल्लारपूर,उपविभागीय अधिकारी बल्लारपुर,जिल्हाधिकारी चंद्रपूर,पोलिस प्रशासन यांच्या कडे न्याय व हक्क मागीत होते.
मात्र या प्रकरणात महसूल अधिकारी व पोलिस अधिकारी सुद्धा सामिल आहेत,म्हणून त्यांच्या विरुद्ध फौजदारी पीटिशन न्यायालयात दाखल झाली आहे.
ज्या लोकांनी ते बोगस प्लाॅट नोटरी करुन घेतलेले आहेत,व काही घरे बांधत आहे त्यांनी सावधान राहावे.कारण ती संपूर्ण जमीन मुळ आदिवासी यांना परत जाणार आहे.
कायद्याचा बाहेर जाऊन नियमबाह्य व बेकायदेशीर काम करना-यांचे धाबे दणाणले असल्याचे वास्तव आहे.
*****
जनहितार्थ जारी..
समाजहितासाठी,देशहितासाठी,राष्ट्रबांधनीसाठी,लोकशाही बळकट करण्यासाठी,संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे धन्यवाद…..
मार्गदर्शक करनारे खुद्द संघर्षी आयु विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर हेच आहेत…
संपर्क क्रमांक….
९८५०३८२४२६…/… ८३२९४२३२६१…



