सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीदिनी फुले दाम्पत्य प्रतिष्ठान गडचिरोली येथे अभ्यासिका तथा वाचनालयाचे उद्घाटन संपन्न….

प्रितम जनबंधु

     संपादक 

          आज दि. 3 जानेवारी 2024 रोजी क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 192 व्या जयंतीदिनी सावीत्रीमाई फुले याच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, या निमित्याने फुले दाम्पत्य प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करुन सार्वजनिक अभ्यासिका वाचनालयाचे उद्घाटन तथा लोकार्पन करण्यात आले. 

             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेशजी सोनुले, उपाध्यक्ष फु.दा.प्र.वि.सं.गड, तर उद्घाटक म्हणून फुलचंद गुरनुले अध्यक्ष जिल्हा माळी समाज संघटना गडचिरोली, प्रमुख पाहुणे म्हणून शिवदास मोहुर्ले रा.करंजी ता.माहुर जि.नांदेड आदी मान्यवर उपस्थित होते.

           यावेळी हरिदासजी कोटरंगे यांनी उपस्थितांकडुन संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन घेतले. मा.पुरुषोत्तमजी लेनगुरे यांनी सदर अभ्यासिकेचा जिल्ह्यातील समग्र विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. 

               कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सुखदेवजी जेंगठे, किरण शेंडे, प्रविण मोहुर्ले, किशोर सोनुले, सुरज मांदाडे, चिमुकले कियांश सोनुले, प्रज्वल व मृणाल लेनगुरे, स्वरा मोहुर्ले, कांता लोनबले, प्रभा सोनुले, सारिका लोनबले यांनी उपस्थित राहुन मोलाचे सहकार्य केले.