Home Maharashtra चुरचुरा येथे बुद्ध विहाराचे लोकार्पण संपन्न…

चुरचुरा येथे बुद्ध विहाराचे लोकार्पण संपन्न…

दिक्षा कऱ्हाडे

 वृत्त संपादिका

     गडचिरोली-येथून जवळच असलेल्या चुरचुरा येथील संबुद्ध महिला मंडळ व बौद्ध समाजाने उभारलेल्या बुद्ध विहाराचे उदघाटन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

       केंदीय जल बोर्डाचे सेवानिवृत्त चेअरमन दिवाकर रायपुरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

      आंबेडकरी अभ्यासक डॉ. दिलीप बारसागडे,भातरतीय बौद्ध माहासभेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम राऊत,रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे,सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण बांबोडे,चेतन गोरे,चेतना लाटकर,डॉ.शुभम कांबळे,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बांबोडे,पोलीस पाटील शशांक कुलसंगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते

      प्रारंभी बौद्ध भिक्खू पूज्य डॉ. धम्मसेवक महाथेरो आणि भन्ते सोन यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली व गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर झालेल्या प्रबोधन सभेत मान्यवर पाहुण्यांची समयोचित भाषणे झाली.

        आपल्या भाषणात रोहिदास राऊत यांनी बुद्धाचा विचार मानव जातीसाठी व मानवी कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगून आज जगात सर्वत्र युद्ध आणि अशांततेचे वातावरण असताना हा विचारच शांतता आणि मैत्री व बंधुभाव निर्माण करू शकतो असे प्रतिपादन केले.

         डॉ.दिलीप बारसागडे यांनी बुद्ध तत्वज्ञानावर प्रकाश टाकून संपूर्ण समाजाने त्याचा अंगीकार करावा असे आवाहन केले.अन्य वक्त्यांनी सुद्धा याप्रसंगी आपले विचार प्रगट केले. कार्यक्रम प्रसंगी महिलांनी बुद्ध जीवनावर आधारित सुंदर नृत्य सादर.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक एड.जितेंद्र लोणारे,संचालन रामनाथ खोब्रागडे व आभार प्रदर्शन खुशाल खोब्रागडे यांनी केले.रात्री दुर्वास करकाडे यांच्या बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम घेण्यात आला.

         बौद्ध समाजाचे अध्यक्ष हिरोबी खोब्रागडे,महिला मंडळाच्या पदाधिकारी अश्विनी लोणारे,भावना खोब्रागडे,शोभा रायपुरे,माधुरी डोंगरे व अन्य सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमास चुरचुर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.