कोकणातील बारसू रिफायनरीला आॅड. बाळासाहेब आंबेडकरांचा निसर्गाच्या रक्षणासाठी व लोक कल्याणासाठी विरोध..

 

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

    कोकणात ९५ टक्के शुध्द आॅक्सिजन आजही आहे.कोकणातल वातावरण अत्यंत शुध्द असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वनस्पती व प्राणी तिथे जन्माला येतात.यामुळे तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारसू रिफायनरीचा आग्रह करु नये.अन्यथा एन्नानला ज्या पध्दतीने घालवले त्याच पध्दतीने बारसू रिफायनरीला घालवू असा गंभीर इशारा वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे.

            कोकणातील शुध्दता तशीच टिकली पाहिजे.राहिला कोकणातील लोकांचा प्रश्न,तर त्यांनी सर्वांना आठवण करून देण्यासाठी सांगितले की,बॅरिस्टर ए.आर.अंतुले मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की,पुर्ण वेळ मिळाला तर मी कोकणाचा कॅलिफोर्निया करु शकतो.ते खोटं नव्हतं.परंतु जेव्हा त्यांनी प्रयत्न केला त्यावेळी त्यांच मुख्यमंत्री पद घालवण्यात आलं होत याची आठवण करून दिली.

          प्रदुषणकारी उधोग आणण्यापेक्षा कोकणातल्या नैसर्गिक संपत्तीचं व्यवस्थित नियोजन केल गेल आणि त्यांच्यासी संबंधित कोकणी माणसाच्या उधोगांना चालना दिली गेली तर तेलंगणा प्रमाणेच तिथल्या मानसांचे मासिक उत्पन्न वाढू शकते असे त्यांनी स्पष्ट केले..

             एकंदरीत असे की बारसू रिफायनरी पेक्षा नैसर्गिक हिताला व सामान्य जनतेच्या उत्तम कल्याणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्व देण्याची गरज आहे असा दुरदृष्टीचा संदेश दिला व ऐकत नसाल तर एन्नानला जसे घालवले तसेच बारसू रिफायनरीला घालवू असा गंभीर इशारा महाराष्ट्र राज्यातील सत्ताधाऱ्यांना दिला.