भंडारा-गोंदिया येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार साकोलीत.. — २ जानेवारीला ठिक ११ वाजता सुरुवात होणार सभेला..

      ऋग्वेद येवले 

नागपूर विभागीय प्रतिनिधी

        भंडारा,गोंदिया,जिल्हातंर्गत सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांची व तालुका स्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक साकोली येथे आयोजित करण्यात आली आहे.

      सदर बैठक २ जानेवारी २०२४ रोज मंगळवारला साकोली येथील आशिर्वाद सभागृहात ठिक ११ वाजता सुरुवात होणार आहे.

             वंचित बहुजन आघाडी भंडारा व गोंदिया जिल्हा पदाधिकारी,युवा पदाधिकारी,महिला आघाडी पदाधिकारी आणि भंडारा व गोंदिया तालुका अध्यक्ष,युवा तालुका अध्यक्ष,महिला तालुका अध्यक्ष यांना प्रशिध्दी माध्यमाद्वारे व भ्रमणध्वनी द्वारा बैठकी बाबत माहिती देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

           वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने भंडारा व गोंदिया जिल्हा मिळून वंचित बहुजन आघाडीची बैठक होत आहे.

            सदर बैठकीला भंडारा-गोंदिया जिल्हा प्रभारी भगवानभाऊ भोंडे,भंडारा-गोंदिया जिल्हा महिला निरीक्षक सुनिताताई टेभुर्णे जिल्हा निरीक्षक भंडारा,गोंदिया- भंडारा जिल्हाध्यक्ष धनपाल गडपाईले,गोंदिया जिल्हाध्यक्ष सतिशजी बनसोड, या सर्वांच्या उपस्थित नियोजन बैठक घेण्यात येणार व मार्गदर्शन होणार आहे.

             सदर बैठकीला सर्व जिल्हा पदाधिकारी व दोन्ही जिल्ह्यातील सर्व विंगच्या तालुका अध्यक्षांनी वेळेवर उपस्थित राहावे,असे आव्हान भंडारा जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले व जिल्हा संघटक डी.जी.रंगारी,तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी यांनी केले आहे.